Gautami Patil Reaction  esakal
मनोरंजन

Gautami Patil : 'पण तुम्ही का जळता?' गौतमीचा कुणावर निशाणा?

सोशल मीडियावर सध्या एकाच मराठी सेलिब्रेटीचा जलवा आहे. ती म्हणजे गौतमी पाटील.

सकाळ डिजिटल टीम

Gautami Patil Viral Video Reaction- सोशल मीडियावर सध्या एकाच मराठी सेलिब्रेटीचा जलवा आहे. ती म्हणजे गौतमी पाटील. आपल्या बोल्ड डान्समुळे गौतमी पाटील कायमच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून गौतमीच्या डान्सवर बंदी घालण्यात यावी. अशी मागणी काही नेटकऱ्यांकडून आणि मनोरंजन क्षेत्रातील संस्थाकडून होताना दिसते आहे.

गौतमीच्या डान्सवर तातडीनं बंदी घालण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. तिचा डान्स हा अश्लीलतेकडे झुकणारा आहे. असेही तिच्या विरोधकांचे म्हणणे आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये तर राज्यातील प्रसिद्ध नृत्यांगनांनी एकत्र येऊन गौतमीला तर थेट इशाराच दिला होता.

Also Read- जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

काही दिवसांपूर्वी गौतमीनं आपण आता लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत गौतमीला शुभेच्छाही दिल्या होत्या. यासगळ्यात गौतमीचे दरम्यानच्या काळात राज्यात जेवढे कार्यक्रम झाले त्यात मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. सांगलीतील कार्यक्रमानं तर कहर केला होता.

“माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आपल्या भूमिकेबाबत गौतमीनं काही सांगितले नसून तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. असे आवाहन तिनं चाहत्यांनी केले आहे. याशिवाय लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करत आहोत. असे ती म्हणाली आहे.

यासगळ्यात गौतमीचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये तिनं तिच्यावर टीका करणाऱ्यांना एका गाम्याच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. एका हिंदी चित्रपटातील गाण्यावर रिल्स तयार करत आपल्यावर विनाकारण का जळता आहात, असा प्रश्न तिनं टीकाकारांना केला आहे. यावर तिला मिळालेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याने घेतली उसळी तर चांदी घसरली ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Iran US Conflict: पश्चिम आशियातील तेल निर्यात रोखू; नाकेबंदीनंतर इराणचा इशारा, अमेरिकेच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पर्वती येथील शाहू वसाहत एसआरए प्रकल्पावरील सुनावणी आज; नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

बारामतीत कारची वारकऱ्याला धडक, अपघातात वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू

Nagpur Tiger Census: आनंदाची बातमी! नागपूरच्या जंगलात वाघांची डरकाळी; पहिल्याच अधिकृत गणनेत 42 ते 45 वाघांची नोंद

SCROLL FOR NEXT