Giorgia Andriani esakal
मनोरंजन

Giorgia Andriani: 'वयाचा आकडा महत्वाचा नाहीतर...' अरबाजच्या गर्लफ्रेंडनं सांगून टाकलं!

बॉलीवूडमध्ये खान ब्रदर्स हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात.

सकाळ डिजिटल टीम

Giorgia Andriani on the age gap between her and Arbaaz Khan: बॉलीवूडमध्ये खान ब्रदर्स हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे चाहते आपल्या आवडत्या कलाकाराविषयी भरभरून बोलताना दिसतात. मग तो सेलिब्रेटी आमीर खान असो, सलमान खान असो किंवा शाहरुख. याशिवाय सलमानचा भाऊ अरबाज खान देखील लाईमलाईटमध्ये असल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियावर अरबाजच्या नव्या गर्लफ्रेंडचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरुन नेटकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चाही सुरु झाली आहे. त्यावरुन चाहत्यांनी वेगवेगळे अंदाजही लावले आहेत. मात्र धक्कादायक खुलासा केला आहे तो जॉर्जिया अंद्रानीनं. तिची बॉलीवूड हंगामावर एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये तिनं अरबाज आणि तिच्या रिलेशनशिपवर दिलखुलासपणे प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

गेल्या काही दिवसांपासून अरबाज आणि जॉर्जियाबद्दल वेगवेगळया प्रतिक्रिया नेटकरी देऊ लागले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यापासून अरबाजच्या रिलेशनशिपवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मलायका तर प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरसोबत लग्न करण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. त्यात जॉर्जियाच्या व्हायरल झालेल्या त्या मुलाखतीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुलाखतीमध्ये जॉर्जिया म्हणते, अरबाज आणि माझ्याविषयी चर्चा आहे हे आता सोशल मीडियावर पाहते आहे. त्याच्या आणि माझ्या वयात वीस वर्षांचे अंतर आहे. मला आमच्यातील प्रेम जास्त महत्वाचे वाटते. बाकी वय हा केवळ आकडा आहे. सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे प्रेम. कोणत्याही नात्यात सगळयात महत्वाची असणारी गोष्ट ती आहे. जॉर्जियाच्या मुलाखतीला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Students Protest : MPSC विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये एल्गार, रस्त्यावर येत सरकारविरोधात केल्या घोषणाबाजी

Shocking News : पोपटाच्या मृत्यूने दु:खात बुडाला मालक, मृत पक्षी घेऊन थेट कलेक्टरकडे पोहोचला अन् केली 'ही' मागणी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीमध्ये मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Sangli Election : प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदारांच्या ‘पायावर डोके’; सांगलीत निवडणूक प्रचाराला भावनिक वळण

Pune Municipal Election : पुण्यात भाजपचा पहिला नगरसेवक; मनिषा नागपुरे यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT