lisa banes
lisa banes Team esakal
मनोरंजन

हॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री लीजा बेन्स अत्यवस्थ

युगंधर ताजणे

मुंबई - हॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री लीजा बेन्स (lisa banes) यांना अपघात (accident) झाला आहे. त्यात त्या अत्यवस्थ असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अपघातानंतर त्यांना तातडीनं रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र अजूनही त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. गॉन गर्ल (gone girl) आणि कॉकटेल (cocktail) सारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी लीजा बेन्स प्रसिध्द होत्या. (gone girl actor lisa banes critical after hit and run scooter accident in new york )

सोशल मीडियावर (social media) जेव्हा लीजा यांच्या अपघाताचे वृत्त पसरले तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. हॉलीवूडमध्ये (hollywood) आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणा-या लीजा यांचा सोशल मीडियावर चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हॉलीवूडच्या एका अभिनेत्याचा मृत्यु झाला होता. त्यानंतर ही दुसरी घटना आहे.

अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर लीजा यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. न्यूयॉर्क शहरात ही घटना घडली. लीजा यांचे वय 65 वर्षे आहे. लिंकन न्युयॉर्कमधील लिंकन टॉवर येथे असताना त्यांना एका दुचाकीस्वारानं धडक दिल्याचे समोर आले आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की त्यात लीजा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार हिट अँड रनचा होता. एका काळ्या रंगाच्या दुचाकीस्वारानं लीजा यांना धडक दिली. आणि तो पसार झाला. घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले. मात्र तोपर्यत तो दुचाकीस्वार गायब झाला होता. त्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT