Goodbye Movie first day box office collection, rashmika mandana,amitabh bachchan movie collection not so good. Google
मनोरंजन

Box office वर रश्मिका-अमिताभचा 'गूडबाय' पहिल्याच दिवशी गारद, कमाईचा आकडा लाजवणारा...

समिक्षकांनी 'गूडबाय'चं कौतूक करुनही प्रेक्षकांच्या दरबारी मात्र तो फेल ठरल्याचं चित्र पहिल्या दिवशी दिसून आलं आहे.

प्रणाली मोरे

Goobye Box office collection: विकास बहल दिग्दर्शित 'गूडबाय' हा कौटुंबिक धाटणीचा सिनेमा आता प्रदर्शित झाला आहे. रश्मिका मंदाना,अमिताभ बच्चन आणि नीना गु्प्ता यांच्या भूमिका असलेल्या 'गूडबाय'चं पहिल्या दिवशीचं बॉक्सऑफिस कलेक्शन समोर आलं आहे आणि ते खूपच निराशा करणारं आहे. ७ ऑक्टोबर,२०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या गूडबाय सिनेमाचा रीव्ह्यू जरी चांगला आला असला तरी बॉक्सऑफिसवरील कलेक्शनच्या बाबतीत मात्र सिनेमानं मात खाल्ली आहे. चला जाणून घेऊया गूडबाय सिनेमाची पहिल्या दिवशीची कमाई नक्की किती झालीय.(Goodbye Movie first day box office collection, rashmika mandana,amitabh bachchan movie collection not so good.)

पहिल्याच दिवशी रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांच्या 'गूडबाय' च्या वाट्याला बॉक्सऑफिसवर स्ट्रगल आलं आहे. जितक्या कमाईची आशा केली जात होती त्यापेक्षा कितीतरी कमी कमाई पहिल्या दिवशी सिनेमानं केली आहे. 'गूडबाय'नं पहिल्या दिवशी फक्त १.२ करोड रुपयेच कमावले आहेत. आणि हा आकडा मेकर्ससोबत रश्मिकाच्या चाहत्यांसाठीही हैराण करणारा आहे.

'गूडबाय' सिनेमाला समिक्षकांनी गौरवलं असलं तरी मायबाप प्रेक्षकांनी मात्र त्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं आहे. सिनेमाकडून आशा केली जात होती की,बॉक्सऑफिसवर गूडबाय सुसाट पळेल पण तसं काहीच होताना दिसत नाही. पहिल्याच दिवशी रश्मिका,अमिताभ बच्चन सारखे बडे सेलिब्रिटी असूनही प्रेक्षकांनी मात्र थिएटरात सिनेमा पहायला जाणं टाळलं आहे. स्वतः रश्मिकानं सिनेमाच्या प्रमोशसाठी कंबर कसली होती. कितीतरी टी.व्ही शोमध्ये हजर राहिली, अनेक शहरांचे दौरे तिने केले. पण याचा काहीच फायदा झाला नाही,कारण तसं पाहिलं तर याचा सिनेमाच्या कमाईवर चांगला परिणाम व्हायला हवा होता''.

२०२२ मध्ये सगळ्यात कमी कलेक्शन करणाऱ्या सिनेमांच्या यादीवरनं एक नजर फिरवूया. आता यात रश्मिकाचा 'गूडबाय' जाण्याचे जास्त चान्सेस आहेत बरं का.

बधाई दो - 19 करोड़ रुपये

झुंड - 23 करोड़ रुपये

हीरोपंती 2 - 21.5 करोड़ रुपये

रनवे 34 - 35 करोड़ रुपये

जर्नी - 20.54 करोड़

जयेशभाई जोरदार - 17.91 करोड़ रुपये

धाकड - 4 करोड़ रुपये

अनेक - 9 करोड़ रुपये

जनहित में जारी - 3.74 करोड़ रुपये

निकम्मा - 2.19 करोड़ रुपये

राष्ट्रकवच ओम - 8 करोड़ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT