ricky kej
ricky kej  google
मनोरंजन

Grammy 2022 : अभिमानास्पद, भारताच्या रिकी केज यांना ग्रॅमी, नमस्ते करून..

नीलेश अडसूळ

संगीत क्षेत्रातला सर्वोच्च मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards 2022) सोहळ्याकडे पाहिले जाते. या सोहळ्यात संगीतक्षेत्रातील अनेक दिग्ग्जांना संगीतातील त्यांच्या योगदानासाठी पुरस्काराने गौरविले जाते. संगीत क्षेत्रातील मान्यवर आवर्जुन या सोहळ्याला उपस्थिती दर्शवतात. यंदा या सोहळ्याचे ६४वे वर्ष असून लास वेगास मधील एमजीएम (MGM) ग्रँड मार्की बॉलरूम येथे हा सोहळा पार पडला.

यंदाचे वर्ष भारतीयांसाठी विशेष आहे. भारतीय संगीतकार रिकी केज (ricky kej) यांनी पुन्हा एकदा ग्रॅमी पुरस्कारावर मोहर उमटवली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे रिकी यांचा हा दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे. हा पुरस्कार स्वीकारताना रिकी यांनी सर्व उपस्थितांना नमस्ते करून हा पुरस्कार स्वीकारला. भारतीय संस्काराचे दर्शन थेट ग्रॅमी मध्ये घडवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रॉक लिजेंड स्टीवर्ट कोपलँड यांना 'द पोलीस ड्रमर' (the police drummer) आणि रिकी यांना 'डिव्हाईन टाइड्स' (divine tides) या अल्बम साठी गौरविण्यात आले. या दोघांनाही ग्रॅमीचा 'सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार जिंकल्यानंतर रिकी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. 'आपल्या 'डिव्हाईन टाइड्स' अल्बमला ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याने मी कृतज्ञ आहेत. आणि माझ्या शेजारी उभ्या असलेल्या उमद्या आणि दिग्गज अशा 'स्टीवर्ट कोपलँड' याला खूप सारे प्रेम. तुम्हा सर्वांवरही असेच प्रेम आहे. हा माझा दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे तर स्टीवर्टचा सहावा ग्रॅमी आहे,' असे रिकी म्हणतात.

रिकी केजचा जन्म यूएसएमध्ये झाला होता पण आता तो बंगळुरूमध्ये राहतो आणि काम करतो. रिकी केज, यांना जगभरातील २० पेक्षा जास्त देशांमध्ये १०० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना २०१५ मध्ये त्यांच्या 'विंड्स ऑफ संसारा' या अल्बमसाठी पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांना 'युनायटेड नेशन्स ग्लोबल ह्युमॅनेटेरीयम आर्टीस्ट' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते पर्यावरणाशी निगडित अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय असतात.

'लहरी म्युझिक' या संगीत कंपनी द्वारे 'डिव्हाईन टाइड्स' हा अल्बम रिलीज करण्यात आला आहे. .या मध्ये ९ गाणी आणि ८ म्युझिक व्हिडिओंचा समावेश असून जगभरातील विविध भागांमध्ये या गीतांचे चित्रीकरण झाले आहे. भारताच्या हिमालय लँडस्केप पासून ते स्पेनच्या जंगलांपर्यंत अनेक महत्वाची ठिकाणे चित्रित करण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT