ketaki chitale, ketaki chitale news, ketaki chitale instagram, ketaki chitale facebook, ketaki chitale controversy, ketaki chitale post on Guru Purnima Esakal
मनोरंजन

Ketaki Chitale Post On Guru Purnima: कोण आहे केतकी चितळेचा गुरु? पोस्ट व्हायरल..

Vaishali Patil

Ketaki Chitales New Post: मराठी मनोरंजन विश्वामध्ये अनेक कलाकार आहेत मात्र आपल्या परखड आणि आक्रमक स्वभावामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे काही कलाकार हे चर्चेत असतात. त्यातच आघाडीचं नाव येत ते केतकी चितळेचं.

ती नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर झालेल्या प्रकरणामुळे ती चर्चेत आली अन् आजही तिची चर्चा होतच असते. तरीही ती आपलं मत मांडत असते.

केतकी तिच्या सोशल मीडियावरही कमालिची सक्रिय असते. ती नेहमी काहीतरी पोस्ट करते ज्याची चांगलीच चर्चा रंगते.

आज सर्वत्र गुरूपौर्णिमा साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आध्यात्मिक आणि शैक्षणिक मार्गदर्शकांप्रति अर्थात गुरुप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. अशातच केतकीनंही गुरूपौर्णिमेनिमित्त इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. यावेळी तिने एक लांबलचक पोस्ट शेयर करत तिने आई-वडिलांचे आभार मानले आणि काही खास किस्सेही सांगितले आहे.,

तिने तिचा एक फोटो शेयर केला आहे आणि त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, " प्राथमिक गुरू नेहमी आपले आई वडील असतात. मूल कळत नकळत नेहमीच मोठ्यांचे वागणे पाहत असतं आणि ते मोठ्यांचे वागणे कुठेतरी मनात छापून राहते. माझे लहानपण चित्रपटातील मुलांसारखे किंवा माझ्या वर्गातील इतर मुलांसारखे गेले नाही.

प्रचंड विचित्र परिस्थितीत माझ्या बाबानी दाखवलेला संयम, व आईची खंबीर भूमिका, वयाच्या चौथ्या वर्षी पहिल्यांदा (माझ्या आठवणीत, अर्थात) छाप पाडून गेली.

पुढे मुंबईत बॉम्ब स्फोट व दंगली झाल्या. तेव्हा आमचे घर विविध दुकानांचे गोडाऊन झाले कारण शिवाजी पार्क एपिसेंटर होते जवळपास. तेव्हा शिकले की कठीण समय येता नाव फक्त श्रीहरीचे घेऊन फायदा नसतो तर स्वतः श्रीहरी बनायचे असते.

मग एपिलेप्सी डायग्नोस झाली आणि आई बाबाची एपिलेप्सी म्हणजे काय, हे शिकायची धडपड बघायला सुरुवात झाली.

आपल्या मुलांकडून शिकावे यात त्यांना कधिच कमीपणा वाटला नाही. बऱ्याच गोष्टी ते आमच्याकडून शिकत असतात व दर गुरुपौर्णिमेला पहिला मेसेज नेहमी आईचा असतो: आशिर्वाद व नमस्कार

पण ही शिकवण ते त्यांच्या पालकांकडून शिकले. वयाच्या ९९व्या वर्षी माझ्या आजोबांना इंसेप्शन हा चित्रपट पहिल्यांदा दाखवला आणि बुद्धी बघा त्यांची किती शार्प की जे "I am a Nolan fan" म्हंणाऱ्या ५०% लोकांना कळले नाही ते त्यांनी डोक्यावर हात मारून एका वाक्यात म्हंटले, 'स्वप्नातील स्वप्नातल्या स्वप्नात जे घडले त्यामुळे खऱ्या आयुष्यात हा माणूस पैसे देणार!' हे वाक्य ही कळायला अवघड आहे बऱ्याच "मराठी अस्मिता" बाळगणाऱ्या युवकांना, कारण simple मराठी नाही.

लहानपणी माझी पणजी आमच्याकडे बऱ्याच वेळा यायची. ती इतकी स्ट्रॉंग बाई की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तुरुंगवास तिने भोगला होता. तीने कहाण्या (किस्से) सांगताना शिकवले की कुठल्याही परिस्थितीत माणसाने जगायला शिकावे आणि जगणे म्हणजे फक्त जिवंत राहणे नव्हे तर दुसऱ्यांना मदत करणे.

एपिलेप्सीची ऋणी तर मी नेहमीच राहणार कारण एपिलेप्सी नसती तर केतकी चितळे एक किरकोळ सामान्य दादर शिवाजी पार्क, डोक्यावरून पाणी विले पारले मध्ये राहणारी दोन मुलांची आई जी आपण बरे, आपला परिवार बरा अशा विचारांची बाई असती. एपिलेप्सीने मला ताकद दिली लढायची, आपल्यावर हसणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर द्यायची. एपिलेप्सी आपला एक भाग आहे मग कुणाला अधिकार नाही त्यावर हसायचा हे मनात ठाम एपिलेप्सीने केले.

आज गुरुपौर्णिमा, सोशल मिडियावर फक्त या तिघांनाच साष्टांग नमस्कार.

"गुरू असतात अनेक, गुरू होतात अनेक,

गुरू वागतात अनेक; पण मान कमवतात क्वचितच."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?

मी अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही... टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल ऋता दुर्गुळेने मांडलं मत; म्हणते, 'तो कितीही...'

Latest Marathi Breaking News : धक्कादायक! 16 वर्षीय भाचीला सख्या मामानं चालत्या लोकलमधून खाली ढकललं

SCROLL FOR NEXT