Director Hansal Mehta marries his longtime partner Safeena Husain; Instagram
मनोरंजन

१७ वर्ष लिव्ह-इनमध्ये अन् ५४ व्या वर्षी दिग्दर्शकाचा लग्नाचा निर्णय, का?

बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक हसंल मेहता सफीना हुसैन सोबत लीव्ह-इन मध्ये राहत होते.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक हंसल मेहता(Hansal Mehta) १७ वर्ष सफीना(Safeena) हुसैन सोबत लीव्ह-इन (Live-In Relationship)मध्ये राहत होते. पण आता वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी आपल्या या पार्टनरसोबत लग्न(Marriage) करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांना खरंतर दो मुलीदेखील आहेत. हंसल मेहता यांनी इन्स्टाग्रामवर खूप फोटो शेअर करीत ही आनंदाची बातमी दिली आहे. हंसल मेहता यांच्या लग्नाचे खूप सुंदर फोटो जोरदार व्हायरल झाले आहेत. सगळ्याच सेलिब्रिटींनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हंसल मेहता यांनी फोटोला सुंदर कॅप्शनही दिलं आहे.(Director Hansal Mehta marries his longtime partner Safeena Husain)

हंसल मेहता यांनी लग्नाचे खूप सारे फोटो शेअर करत लिहिलं आहे, ''१७ वर्ष एका जोडप्यानं आपल्या मुलांना मोठं होताना पाहिलं आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना लग्नाचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणेच आयुष्यात ही गोष्ट देखील अचानक घडत आहे आणि अनियोजित होतं हे सगळं. हो पण आम्ही एकमेकांना दिलेली वचनं मात्र खरी होती. अर्थात नेहमीप्रमाणेच प्रेम सगळ्यावर भारी पडतं ते खरंय''.

हंसल मेहता यांनी लग्नात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर ब्राऊन रंगाचा ब्लेझर घातला आहे. तर सफिना यांनी गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे. हे कपल फोटोमध्ये लग्नासंदर्भातील कायदेशीर कागदपत्रांवर हस्ताक्षर करताना दिसत आहे. या कपलला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता प्रतिक गांधीनं लिहिलं आहे,'हे प्रेम आहे आणि ते प्रेरणादायी देखील आहे'.

हंसल मेहता चार मुलांचे वडील आहेत. त्यांना दोन मुलगे आणि दोन मुली देखील आहेत. हंसल मेहता यांना पहिल्या लग्नापासून दोन मुलगे आहेत. तर सफिनासोबत लीव्ह-इनमध्ये असताना त्यांना दोन मुली देखील झाल्या आहेत. चारही मुलांना कपलनं मोठं होताना पाहिलं आहे आणि आता ते लग्नबंधनात अडकले आहेत. चाहत्यांनी कपलच्या प्रेमाला 'मॉडर्न लव' म्हणून संबोधलं आहे.

हंसल मेहता यांनी आतापर्यंत 'जयते','दिल पे मत ले यार','छल','शाहिद','सिटी लाइट' अशा अनेक वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचं दिग्दर्शन-निर्मीतीची जबाबदारी देखील पेलली आहे. 'शाहिद' सिनेमासाठी त्यांना २०१३ साली नॅशनल अॅवॉर्डनं गौरविण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT