Hansika Motwani attended fiance sohael Khaturiya first wedding,she seen dancing Google
मनोरंजन

Viral Video: होणाऱ्या नवऱ्याच्या पहिल्या लग्नात धम्माल करताना दिसली हंसिका मोटवानी, चाहते हैराण...

अभिनेत्री हंसिका मोटवानी राजस्थानमध्ये शाही अंदाजात सोहेल खतुरियासोबत लग्न करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली होती.

प्रणाली मोरे

Hansika Motwani: 'क्योंकी सास भी कभी बहु थी' आणि 'शका लका बूम बूम' सारख्या मालिकांमधून बालकलाकार म्हणून आपलं करिअर सुरू करणारी हंसिका मोटवानी सध्या तिच्या लग्नामुळे भलतीच चर्चेत आहे. हिंदी मालिकांपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सगळीकडेच आपल्या अभिनयाची चमक दाखवणारी हंसिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

या दरम्यान आता हंसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याच्या पहिल्या लग्नाचा व्हिडीओ जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे,ज्यामध्ये दस्तुरखुद्द हंसिका आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या पहिल्या लग्नात एन्जॉय करताना दिसत आहे.(Hansika Motwani attended fiance sohael Khaturiya first wedding,she seen dancing)

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

Hansika Motwani attended fiance sohael Khaturiya first wedding,she seen dancing

हंसिका मोटवानीला तिचा होणारा नवरा व्यावसायिक सोहेल खतुरियाने पॅरिसमध्ये प्रपोज केलं होतं. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो जोरदार व्हायरल झाले होते. दोघं आता लवकरच लग्न देखील करणार आहेत. पण आता यादरम्यान सोहेलच्या पहिल्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे,ज्यात हंसिका कितीतरी वेळा त्याच्या कुटुंबासोबत,मित्र-परिवारासोबत मजामस्ती करताना दिसत आहे आणि लग्नदेखील एन्जॉय करत आहे.

सोहेलच्या पहिल्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर आहे,ज्यात लग्नाच्या आधीचे सगळे सोहळे दिसतायत आणि हंसिका मोटवानी देखील त्यात धम्माल करताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार हंसिकाचा होणारा नवरा सोहेल खतुरियाने २०१६ मध्ये रिंकी नावाच्या मुलीसोबत गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. या लग्नाला कुटुंबिय आणि मित्रपरिवार उपस्थित होता,ज्यात हंसिका देखील होती.

हा व्हिडीओ पाहून लोक आता हैराण झाले आहेत की आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या पहिल्या लग्नात हंसिकानं किती मज्जा केली होती. इतकंच नाही तर कलीरा विधीच्या वेळेस नवरीच्या हातातून कलीऱ्याचा तुकडा पडताना दिसतो,जो नेमका हंसिकाच्या पाठीच जाऊन पडतो.

Hansika Motwani attended fiance sohael Khaturiya first wedding,she seen dancing

रिंकी बजाजसोबत पहिलं लग्न करणाऱ्या सोहेलचं हंसिकासोबत हे दुसरं लग्न आहे. माहितीसाठी सांगतो की सोहेल खतारिया मुंबईतील एक व्यावसायिक आहे. तो टेक्सटाईल बिझनेसमध्ये आहे,त्याची कंपनी १९८५ पासून गारमेंट्सच्या एक्सपोर्ट बिझनेसमध्ये आहे.

पॅरिसमध्ये आयफेल टॉवरसमोर सोहेलनं हंसिकाला प्रपोज केलं होतं आणि ते फोटो त्याने सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. बोललं जात आहे की हंसिका आणि सोहेल ४ डिसेंबरला जयपुरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्न रॉयल अंदाजात होणार असल्याची चर्चा केव्हापासूनच सुरू झाली आहे. राजस्थानमधील ४५० वर्ष जुन्या मुंडोता फोर्ट अॅन्ड पॅलेसमध्ये हंसिका सोहेलसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

Asia Cup 2025: 'माणसाच्या जीवाची किंमत शून्य; IND vs PAK सामना पाहाणार नाही', माजी क्रिकेटपटू बरसला

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Gaza City: ‘गाझा सिटी’ला उपासमारीचा विळखा! पाच लाख जणांना धोका; सप्टेंबरअखेरपर्यंत समस्या तीव्र होणार

SCROLL FOR NEXT