Happy Birthday Rekha, 69 years Old, childhood Memory, Esakal
मनोरंजन

Happy birthday Rekha: सोपा नव्हता रेखाचा प्रवास! अभिनेत्री होण्याआधी सोसले हाल, वडिलांचा करायच्या तिरस्कार

रेखा यांचा आज १० ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. त्या 69 वर्षांचा झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Happy BIrthday Rekha: बेधुंद करणारी नजर आणि घायाळ करणाऱ्या अदाकारीने जिनं लाखो चाहत्यांना वेड लावलं ती अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखा यांचा आज वाढदिवस आहे. त्या 69  वर्षांच्या झाल्या आहेत. वयाचा आकडा वाढला असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरची चमक आजही तरुण अभिनेत्रींना लाजवेल अशीच आहे.

रेखा म्हणजे हिंदी सेनेसृष्टीतील एकेकाळी कायमच चर्चेत असलेलं नाव. बड्या बड्या अभिनेत्रींना देखील त्यांच्याबद्दल ईर्षा वाटायची. रेखा या प्रेमसंबंध तसंच त्यांचं खासगी आयुष्य अशा अनेक कारणांमुळे कायम चर्चेत राहिल्या.

रेखा यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्या अभिनेत्री होण्याआधीच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.(Happy Birthday Rekha, 69 years Old, childhood Memory)

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी रेखा यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत.त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागलाय. रेखा यांच्या आई कर्जबाजारी झाल्या होत्या. त्यांच्यावर खूप मोठ कर्ज होतं त्यामुळे अगदी कमी वयातच रेखा यांना काम करावं लागलं होतं. रेखा आपल्या वडिलांचा खूप तिरस्कार करायच्या. यामागचं कारण म्हणजे त्यांच्या वडिलांनी रेखा यांना कधीच मुलगी म्हणून स्वीकारलं नव्हतं.

खरं तर रेखा यांचे वडील तामिळ सेनेसृष्टीतील सुपरस्टार होते. तर त्यांच्या आई देखील तामिळ इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री होत्या. असं म्हटलं जातं की रेखा यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचं लग्न झालं नव्हतं.

किंबहुना त्यांनी कधी लग्नच केलं नाही. रेखा यांच्या वडिलांनी चार विवाह केले होते मात्र त्यांनी रेखा यांच्या आईशी विवाह केला नव्हता. तसंच रेखा माझं रक्त नाही असं म्हणत त्यांनी कधीच मुलगी म्हणून रेखा यांचा स्वीकार केला नाही.

म्हणूनच रेखा वडिलांचा तिरस्कार करायच्या. एवढंच काय तर त्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठीही त्या गेल्या नव्हत्या.

मैत्रिणी त्यांची थट्टा करायच्या

लहानपणीपासूनच रेखा यांना अभिनेत्री होण्याची इच्छा होती. ज्यावेळी रेखा त्यांच्या मैत्रिणींमध्ये अभिनेत्री होण्याच्या इच्छेबद्दल सांगत त्यावेळी मैत्रिणी त्यांची थट्टा करत. एका मुलाखतीमध्ये रेखा यांनी त्यांच्या लहानपणाची ही आठवण सांगितली होती.

"जेव्हा मी मैत्रिणींमध्ये मला अभिनेत्री व्हायचंय असं म्हणायचे तेव्हा त्या माझ्यावर हसायच्या आणि तोंड पाहिलं आहेस का? असं म्हणत माझी थट्टा करायच्या" असं रेखा यांनी सांगितलं होतं.

वाढदिवसानिमित्त रेखा यांना सोशल मीडियावरून चाहते तसंच अनेक सेलिब्रिटी शुभेच्छा देत आहेत. रेखा यांनी सिनेमांमधून ब्रेक घेतला असला तरी त्या कायमच चर्चेत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Doctor Case : फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन; फरार आरोपींचा शोध सुरु

Mumbai Crime: मुंबईत दिवसाढवळ्या थरार! जीव मुठीत घेऊन रस्त्यावर पळत सुटली पण...; प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य

Shreyas Iyer ने कसोटी क्रिकेटमधून का घेतला ब्रेक? अखेर स्वत:च सांगितलं नेमकं खरं कारण काय

Mumbai News: विरार ते मरीन ड्राइव्ह आता नॉन-स्टॉप! सी लिंक प्रकल्पाला 'पर्यावरण'ची अंतिम मंजुरी

Female Doctor Case: पीएसआय आणि अन्य आरोपीनं महिला डॉक्टरचा छळ का केला? पीडितेच्या भावानं खरं कारणच सांगितलं, वाचा इनसाईड स्टोरी...

SCROLL FOR NEXT