sanjay leela bhansali happy birthday
sanjay leela bhansali happy birthday 
मनोरंजन

शिवणकाम करणाऱ्या आईचा मुलगा ते बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - ऐतिहासिक आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे ओळखले जाणारे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी आज त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ऐतिहासिक कथानकांना पडद्यावर साकारण्याचं काम संजय भन्साळी यांनी करून दाखवलं आहे. त्यांच्या चित्रपटांमुळे अनेकदा वादही निर्माण झाले. मात्र तरीही त्यांनी अनेक सुंदर अशा कलाकृती प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. बाजीराव मस्तानी ते पद्मावत असे भव्य चित्रपटाने प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले. यशाच्या शिखरावर असलेले संजय लिला भन्साळी यांचं आयुष्य संघर्षाने भरलेलं आहे. 

संजय लिला भन्साळींचा जन्म 24 फेब्रुवारी 1963 साली झाला. भुलेश्वर इथं एका गुजराती कुटुंबात जन्मलेल्या भन्साळींना बराच संघर्ष करावा लागला. भन्साळी त्यांचे नाव संजय लिला भन्साळी असं लिहितात. लिला हे त्यांच्या आईचं नाव आहे. त्यांची आई कपडे शिवण्याचं काम करत होती. एका गुजराती कुटुंबात जन्मलेल्या संजय लिला भन्साळी यांच्या घरी गुजराती भाषा, संस्कृती असल्यानं त्याचा प्रभावही त्यांच्यावर आहे. गुजराती संगित, ललित लेख यांची आवड असलेल्या भन्साळींना गुजराती पदार्थ खायला खूप आवडतं. 

चित्रपट सृष्टीतील करिअऱची सुरुवात त्यांनी परिंदा चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. प्रसिद्ध दिग्दर्शक विदू विनोद चोपडा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर 'परिंदा,1942' हा पहिला चित्रपट भन्साळींनी दिग्दर्शित केला. परिंदा 1942 या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही पण वेगळा विषय मांडल्यामुळे समीक्षकांनी मात्र कौतुक केलं. 'परिंदा,1942'चित्रपटाला फिल्म फेअर अवॅार्डने गौरवण्यात आले होते.

भन्साळींनी देवदास, हम दिल दे चुके सनम, ब्लॅाक सारखे सुपरहिट चित्रपट दिले. याशिवाय राम लिला, मलाल, मेरी कोम या चित्रपटाची निर्मिती संजय भन्साळींनी केली. 'सावरिया' चित्रपटातून रणबीर कपूर आणि सोनम कपूर या कलाकारांना  बॅालिवूडमध्ये लाँच केले.   

बॅलिवूडमधील ऐतिहासिक चित्रपटांची संकल्पना बदलली मोठे सेट,उत्तम पार्श्वसंगित, कलाकारांचे पोषाख या सगळ्यांवर विषेश लक्ष देऊन भन्साली ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करतात. संगीताचे उत्तम ज्ञान असल्याचा फायदा म्हणजे चित्रपटांना संगीत तेच देतात. ऐतिहासिक घटनेतील व्यक्तींचे पात्र साकारणाऱ्या कलाकरांकडून त्यांची भूमिका हुबेहूब वठवून घेण्याचं कसबं त्यांच्याकडे आहे. यामुळेच त्यांचे बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारखे चित्रपट प्रेक्षकांना आवडले आणि सुपरहिट ठरले. 

भारत सरकारने 2015 मध्ये संजय लिला भन्साळींना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे. चित्रपटसृष्टीत अप्रतिम कलाकृती निर्माण करणाऱ्या संजय भन्साळींना वाढदिवसानिम्मित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. 2021 मधील वादग्रस्त चित्रपट अशी चर्चा होत असलेल्या गंगूबाई काठियावाडीचा फर्स्ट लूक भन्साळींच्या वाढदिवशी रिलिज होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 Final Video: अय्यरची विनिंग रन अन् KRR चं गंभीरसह तिसऱ्या ट्रॉफीसाठी जोरदार सेलिब्रेशन, रसेललाही अश्रु अनावर

Kavya Maran KKR vs SRH : हैदराबादच्या मालकीणबाईंच्या डोळ्यात अश्रू तरी दाखवला दिलदारपणा; पाहा VIDEO

Delhi Fire News : विनापरवाना सुरु होतं दिल्लीतलं बेबी केअर हॉस्पिटल; चौकशीत आढळले अनेक गैरप्रकार

Shreyas Iyer : KKR च्या विजयाचं श्रेय श्रेयसचं की गौतमचं? चंद्रकांत पंडितांना विसरून कसं चालेल?

Heatwave : अबब! उन्हाचा पारा ५१ अंशांवर; पुढचे तीन ते चार दिवस रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT