bollywood actress shilpa shetty  esakal
मनोरंजन

Shilpa Shetty Birthday: काय आहे शिल्पाच्या फिटनेसचं 'राज'?

बॉलीवूडमध्ये आपल्या हटके स्टाईलमुळे प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी.

युगंधर ताजणे

Shilpa Shetty Birthday : बॉलीवूडमध्ये आपल्या हटके स्टाईलमुळे प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. वयाची 46 वर्षे पूर्ण करणाऱ्या या अभिनेत्रीची ओळख (Bollywood News) तिच्या फिटनेससाठी देखील आहे. वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये सहभागी होऊन तिनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज शिल्पाचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण तिच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. केवळ भारतातच नाही तर जगभरात शिल्पाचे चाहते आहेत. सोशल मीडियावर देखील ती एक मोठी स्टार आहे. गेल्या वर्षी तिच्या आयुष्यात काही बिकट प्रसंग आले. त्यामुळे तिला ट्रोलही व्हावे लागले होते. मात्र यासगळ्याला शिल्पानं मोठ्या धैर्यानं तोंड दिले.

(Bollywood Actress) बॉलीवूडमध्ये शिल्पाचा प्रवास मोठा खडतर आहे. 90 च्या दशकांतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिल्पाचं नाव घेतलं जात. बाजीगरमध्ये तिनं केलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आजही (Bollywood movies) प्रेक्षकांच्या मनात बाजीगरमधील शिल्पाची भूमिका घर करुन आहे. काही दिवसांपूर्वी ती एका चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. (Shilpa Shetty Fitness) शिल्पा ही तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. फिटनेस फ्रीकसंबंधी वेगवेगळे फोटो शेयर करुन तिनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या शिल्पाला चाहत्यांनी तिच्या फिटनेसचं (Social media viral news) रहस्य विचारले असता शिल्पानं त्यांना अनेक सल्ले दिले आहेत.

शिल्पाच्या दिवसाची सुरुवात ही योगानं होते. कोरोनाच्या काळात तिनं आपल्या सोशल मीडियावरुन योगाचे व्हिडिओ शेयर करुन चाहत्यांना आरोग्याचे महत्व पटवून दिले होते. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे, त्यानंतर नोनी ज्युस घेणे, ज्यामुळे हदयविकाराचा धोका कमी होतो असे शिल्पाचे म्हणणे आहे. याशिवाय ब्रेस्ट कॅन्सरपासून मुक्तता होते असेही शिल्पा सांगते. वजन कमी कऱण्यासाठी नव्हे तर फिट राहण्यासाठी शिल्पा योगा करते. गेल्या पाच वर्षांहून अधिक वर्षांपासून शिल्पा योगा करते आहे. आज आपण जे फिट आहोत त्याचे राज योगा असल्याचे ती आवर्जुन सांगते. एका अपघातात तिच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी तिनं योगाच्या साह्यानं स्वताला सावरले होते. त्यामुळे तिचा योगा करण्यावर भर असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Accident : चाचडगाव टोलनाक्याजवळ भीषण दुर्घटना; ईर्टिगा-स्कॉर्पिओच्या धडकेत गुजरातच्या कुटुंबावर काळाचा घाला

AI Toys Ban : लहान मुलांचे 'बोलके खेळणे' ठरू शकते खतरनाक! सरकारने घेतली मोठी अ‍ॅक्शन; काय मार्केटमधून गायब होतील सगळे गॅजेट्स?

Latest Maharashtra News Updates Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींची पदयात्रा; चंपा चौकात सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त

Devendra Fadnavis : मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण करण्यापलीकडे ठाकरे बंधुंनी काय केलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

Hardik Pandya : २० षटकार, ११ चौकार... हार्दिक पांड्याला आली लहर अन् करतोय कहर; १९ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक अन्...

SCROLL FOR NEXT