Hardeek joshi and Akshaya deodhar Wedding ceremony in pune sakal
मनोरंजन

Hardeek Akshaya Wedding: अखेर तुझ्यात जीव रंगलाच! हार्दिक अक्षया अडकले लग्नाच्या बेडीत..

'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादा अन पाठक बाईंचं आज पुण्यात लगीन लागलं..

नीलेश अडसूळ

Hardeek & Akshaya Wedding : 'तुझ्यात जीव रंगला'फेम राणादा आणि पाठक बाई म्हणजेच मराठीतील प्रसिद्ध कलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर कधी एकदा लग्नगाठ बांधणार यांची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर तो दिवस उगवला आहे. आज 2 डिसेंबर रोजी हार्दिक आणि अक्षया विवाह बंधनात अकडले आहेत.

हार्दिक आणि अक्षया ही दोन्ही कलाकार आपल्या भेटीला आले ते झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून. कोल्हापूरच्या मातीत रंगलेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलीच. शिवाय मालिकेतील प्रमुख कलाकार हार्दिक आणि अक्षया यांच्यावरही भरभरून प्रेम केलं. हार्दिक या मालिकेत राणादादा तर अक्षया अंजली पाठक बाईंच्या भूमिकेत होत्या. त्यांची ही जोडी हिट ठरली. आजही या दोघांना कुणी हार्दिक आणि अक्षया म्हणून फारसं ओळखत नाहीत तर 'राणादा आणि पाठक बाई' म्हणूनच त्यांची ख्याती आहे. असे प्रेक्षकांचे लाडके राणादा आणि पाठक बाई आज खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जीवनसाथी झाले.

हार्दिक अक्षया यांनी बरीच वर्षे एकत्र काम केले आहे, त्यांच्यात घट्ट मैत्री आहे. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, गेल्या वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 3 मे 2022 रोजी त्यांनी अत्यंत दिमाखात आपला साखरपुडा उरकला. त्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ते त्यांच्या लग्नाची. अखेर साखरपुड्यानंतर पाच महिन्यांनी ते लग्न बंधनात अडकले.

मध्यंतरी त्यांचे केळवण झाल्याचेही फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघांच्या कुटुंबाने मिळून नाशिक येवला येथे साड्यांची खरेदी केली. यावेळी अक्षयाची साडी विणतानाचे फोटोही व्हायरल झाले होते. तसेच त्यांची लग्नपत्रिका आणि त्यावर चांदीचे पान याचीही चर्चा झाली होती. पण ही तारीख कोणती असेल याबाबत मात्र गुप्तता पाळली होती. आज मात्र लग्नाच्या व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाली.

हार्दिक-अक्षयाचे हळदी, संगीत सोहळ्याचे फोटो गेली दोन दिवस चर्चेत आहेत. आज 2 डिसेंबर रोजी पुण्यामध्ये त्यांचे लग्न पार पडले असून अत्यंत पारंपरिक असा हा विवाह सोहळा आहे. लग्नानंतर दिमाखदार रीसेप्शन पण असणार आहे. या सोहळ्याला मनोरंजन विश्वातील काही मोजकीच मंडळी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT