Hardeek joshi and Akshaya deodhar Wedding today 25 November at pune  sakal
मनोरंजन

Hardeek Akshaya Wedding: राणादा अन पाठक बाईंचं आज लगीन.. या ठिकाणी होतोय हार्दिक अक्षयाचा विवाहसोहळा..

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी आज विवाहबंधनात अकडणार आहेत.

नीलेश अडसूळ

Hardeek & Akshaya Wedding : 'तुझ्यात जीव रंगला'फेम राणादा आणि पाठक बाई म्हणजेच मराठीतील प्रसिद्ध कलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर कधी एकदा लग्नगाठ बांधणार यांची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर तो दिवस उगवला आहे. आज 25 नोव्हेंबर रोजी हार्दिक आणि अक्षया विवाह बंधनात अकडणार आहेत.

(Hardeek joshi and Akshaya deodhar Wedding today 25 November at pune)

हार्दिक आणि अक्षया ही दोन्ही कलाकार आपल्या भेटीला आले ते झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून. कोल्हापूरच्या मातीत रंगलेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलीच. शिवाय मालिकेतील प्रमुख कलाकार हार्दिक आणि अक्षया यांच्यावरही भरभरून प्रेम केलं. हार्दिक या मालिकेत राणादादा तर अक्षया अंजली पाठक बाईंच्या भूमिकेत होत्या. त्यांची ही जोडी हिट ठरली. आजही या दोघांना कुणी हार्दिक आणि अक्षया म्हणून फारसं ओळखत नाहीत तर 'राणादा आणि पाठक बाई' म्हणूनच त्यांची ख्याती आहे. असे प्रेक्षकांचे लाडके राणादा आणि पाठक बाई आज खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जीवनसाथी होणार आहेत.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हार्दिक अक्षया यांनी बरीच वर्षे एकत्र काम केले आहे, त्यांच्यात घट्ट मैत्री आहे. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, गेल्या वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 3 मे 2022 रोजी त्यांनी अत्यंत दिमाखात आपला साखरपुडा उरकला. त्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ते त्यांच्या लग्नाची. अखेर साखरपुड्यानंतर पाच महिन्यांनी ते लग्न करत आहेत.

मध्यंतरी त्यांचे केळवण झाल्याचेही फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघांच्या कुटुंबाने मिळून नाशिक येवला येथे साड्यांची खरेदी केली. यावेळी अक्षयाची साडी विणतानाचे फोटोही व्हायरल झाले होते. तसेच त्यांची लग्नपत्रिका आणि त्यावर चांदीचे पान याचीही चर्चा झाली होती. पण ही तारीख कोणती असेल याबाबत मात्र गुप्तता पाळली होती.

दोन दिवसांपूर्वीच अक्षयाने एक पोस्ट करत 'मला नवरी झालेल्या पाहायला तुम्ही सज्ज आहात का?' अशी पोस्ट टाकली होती. अखेर तो क्षण आला आहे. आज पुण्यामध्ये त्यांचे लग्न पार पडणार असून अत्यंत पारंपरिक असा हा विवाह सोहळा आहे. या सोहळ्याला मनोरंजन विश्वातील काही मोजकीच मंडळी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold Wave : पुणे गारठले! पारा ९.४°C वर; तीन वर्षांतील विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, पुणेकरांना हुडहुडी!

Latest Marathi Breaking News Live Update : इंदिरानगरमध्ये भोंदू बाबाचा घोटाळा उघड: महिलेला धमक्या देत ५० लाखांची फसवणूक

'या' प्रश्नाचं उत्तर देऊन सुष्मिता सेनने जिंकलेला मिस युनिव्हर्सचा ताज; काय होता तो प्रश्न? तुम्ही काय उत्तर दिलं असतं?

Pisces Love Horoscope 2026: 2026 मध्ये मीन राशीचं प्रेम कोणतं वळण घेणार? शनी सांगतो तुमचं वार्षिक राशीभविष्य

'उर्मिला कानेटकरचं जागी मला विचारण्यात आलं...' घासीराम कोतवाल या हिंदी नाटकात आशिष पाटीलची लावणी, साकारतोय 'गुलाबी' हे पात्र

SCROLL FOR NEXT