Harman Baweja, priyanka chopra, Harman Baweja on Priyanka Chopra Breakup News SAKAL
मनोरंजन

Harman Baweja: मी सर्व मर्यादा ओलांडल्या.. Priyanka Chopra शी ब्रेकअप झाल्यावर हरमन बावेजाने दिला स्वतःला दोष

हरमन आणि प्रियंका या दोघांना बॉलिवूडमध्ये लव्हबर्ड्स म्हणून ओळखलां जायचं

Devendra Jadhav

Harman Baweja on Priyanka Chopra Breakup News: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या अफेयरच्या चर्चा खूप रंगल्या. अगदी हे कलाकार भविष्यात एकत्र राहील अन् लग्न करतील अशीही चर्चा सुरु होती.

पण अचानक काहीतरी बिनसलं आणि अशा कलाकारांचं नातं संपुष्टात आलं. अशीच एक कलाकार जोडी म्हणजे हरमन बवेजा आणि प्रियंका चोप्रा.

हरमन आणि प्रियंका या दोघांना बॉलिवूडमध्ये लव्हबर्ड्स म्हणून ओळखलां जायचं. अखेर दोघांचं नातं का तुटलं या प्रश्नावर इतक्या वर्षांनी हरमनने मौन सोडलं आहे.

(Harman Baweja on Breakup with Priyanka Chopra News)

प्रियांका आणि हरमन 2 वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या नात्यात काय चूक झाली याबद्दल विचारले असता, हरमनने सांगितले की तो प्रियांकाला वेळ देऊ शकला नाही आणि त्यामुळेच त्यांचे ब्रेकअप झाले.

हरमन भावना व्यक्त करताना म्हणाला... “आमच्या दोघांचं ब्रेकअप होण्यासाठी मी स्वतःला दोष देतो. ती मला वेळ द्यायला सांगत होती पण मी नाही दिला.

मी नातं टिकवू शकलो नाही. दोन फ्लॉपनंतर, माझ्या तिसऱ्या चित्रपटात चांगले काम करण्यासाठी मला खूप दडपण जाणवले. मीही मग शूटिंगमध्ये मग्न झालो."

हरमन पुढे म्हणाला, “खरं तर आशु सर (आशुतोष गोवारीकर) मला सांगायचे, ‘कोणत्याही व्यक्तीला त्याची स्पेस द्यावी.' पण मी असं काही केलं नाही. मी सर्व मर्यादा ओलांडल्या.

मी तिच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक गोष्टीत सहभागी होतो. What’s Your Raashee सिनेमा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.”

अनेक मीडिया रिपोर्टनुसार असा दावा करण्यात आला होता की, प्रियांकाने हरमनशी तिचे नाते संपवले कारण तो एक यशस्वी अभिनेता म्हणून स्वत:ला बॉलिवूडमध्ये सिद्ध करू शकला नाही.

तथापि, हरमनने या अफवा फेटाळून लावत असे म्हटले आहे की, “मी यावर कधीही विश्वास ठेवला नाही.

आणि आमच्यात काय चूक झाली हे फक्त आम्हालाच माहीत आहे. आणि अपयशाने मैत्रीत काहीही बदल होत.” अशाप्रकारे प्रियांकाशी ब्रेकअप झाल्याचा दोष हरमन स्वतःला देतो.

प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत लग्न केले आहे. या दोघांना एक लहान मुलगी मालती देखील आहे. प्रियंका अलीकडेच प्राइम व्हिडिओवर प्रसारित होत असलेल्या सिटाडेल या वेब सीरिजमध्ये दिसत आहे.

दुसरीकडे हरमन बावेजा हंसल मेहताच्या स्कूप या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. ही वेबसिरीज २ जूनला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने हरमन अनेक वर्षांनी अभिनय क्षेत्रात आणि पहिल्यांदाच OTT वर झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT