Indian Harry Potter  esakal
मनोरंजन

Indian Harry Potter : आता लवकरच दिसणार 'इंडियन हॅरी पॉटर'! प्रसिद्ध दिग्दर्शकाची घोषणा

ज्या चित्रपटानं साऱ्या जगाला वेडं लावलं त्या हॅरी पॉटरी क्रेझ अजुनही कायम आहे. हॅरी पॉटरसारखी सीरिज लिहून जे के रोलिंग या अब्जोपती झाल्या.

युगंधर ताजणे

Harry Potter Bollywood Remake : ज्या चित्रपटानं साऱ्या जगाला वेडं लावलं त्या हॅरी पॉटरी क्रेझ अजुनही कायम आहे. हॅरी पॉटरसारखी सीरिज लिहून जे के रोलिंग या अब्जोपती झाल्या. जगप्रसिद्ध चित्रपटांच्या यादीत हॅरी पॉटरचे नाव अजुनही घेतले जाते. हॅरी पॉटरच्या बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता बॉलीवूडमध्ये देखील हॅरी पॉटरचा नवा अविष्कार येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अमेरिकन फँटसीमध्ये हॅरी पॉटरचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. हा चित्रपट साऱ्या जगभर प्रसिद्ध आहे. भारतामध्ये देखील त्याचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. यापूर्वी देखील बॉलीवूडमधून हॅरी पॉटरचा रिमेक बनविण्याचे प्रयत्न झाले मात्र त्याला काही यश आले नाही. आता पुन्हा एकदा बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी आता हॅरी पॉटरचे शिवधनुष्य पेलण्याचे ठरवले आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. कपूर यांनी या चित्रपटावर एक मोठा प्रोजेक्ट करण्याचे ठरवले आहे.

Also read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

मिस्टर इंडिया, बँडिट क्विन सारख्या चित्रपटांची निर्मिती करून आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या शेखर कपूर यांचा पानी नावाचा चित्रपट काही केल्या प्रदर्शित होऊ शकला नाही. याची खंत त्यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान व्यक्त केली होती. या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा एक सेट अमेरिकेतील मेक्सिको शहरात होता. मात्र बऱ्याचशा अडचणींमुळे तो चित्रपट काही पूर्ण होऊ शकला नाही. माझ्या आयुष्यातील पाच ते सहा वर्षे या चित्रपटासाठी आपण दिल्याचे त्यांनी सांगितले.

आता मला एक वेगळा प्रोजेक्ट तयार करायचा आहे जो हॅरी पॉटरवर आधारित आहे. तो आपला इंडियन हॅरी पॉटर असेल. मी काय हॅरी पॉटर नाही करणार, आपल्या भारतामध्ये देखील त्या आधारावर बऱ्याचशा कथा आहेत त्यांना समोर आणणार आहे. त्याचे स्वरुप हे त्या हॅरी पॉटर सारखे असेल. भारतामध्ये अशा चित्रपटांचा प्रेक्षक आहे. त्यामुळे येत्या काळात ते बनविण्यासाठी मी उत्सुक असल्याचे कपूर यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT