shilpa shetty 
मनोरंजन

शिल्पा शेट्टीच्या मुलाचा 'हा' व्हिडिओपाहून तुमचेही डोळे चक्रावतील..

सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. या दरम्यान बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या सोशल अकाऊंटवरुन चाहत्यांशी संवाद साधत असतात. इतकंच नाही तर या दरम्यान ते घरात बसून काय करत आहेत याची माहितीही फोटो आणि व्हिडिओच्या माध्यामातून देत असतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हे त्यातलंच एक नाव. शिल्पा शेट्टी सतत तिचे फिटनेस व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या मुलाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहून तुमचे डोळे चक्रावतील.

खरंतर शिल्पा शेट्टी फिटनेसकडे जास्त लक्ष देते हा पाहून मुलगी विआनने देखील त्याच्या फिटनेसवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. शिल्पाने विआनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तो जबरदस्त बॅकफ्लिप म्हणजेच गोलांटी उडी मारताना दिसतोय. विआनने मारलेली ही बॅकफ्लिप एकदम प्रोफेशनल लोकांसारखी आहे. 

हा व्हिडिओ पोस्ट करताना शिल्पाने लिहिलंय, लहान मुलं नेहमीच मोठ्यांचं अनुकरण करत असतात. आम्हाला वर्कआऊट आणि योगा करताना पाहून विआन एवढ्या लवकर आपल्या फिटनेस आणि आरोग्याकडे लक्ष द्यायला लागला आहे. विआनला जिमनॅस्टिक आवडतं म्हणून मी तिथे त्याचं ऍडमिशन घेतलं आहे. मात्र प्रॅक्टीस नसताना जिमनॅस्टीक केलं तर तुम्हाला हानी पोहोचू शकते. त्यासाठी आम्ही नेहमी प्रॅक्टीस करत असतो आणि त्याला व्यस्त आणि ऍक्टीव्ह ठेवत मजबुत बनवतोय. जर तुमच्या मुलाला काही करायचं असेल तर त्याची प्रॅक्टीस करा, त्यामुळे मुलांना भूक लागते आणि त्यांची झोपही व्यवस्थित होते. घरात राहा आणि सुरक्षित राहा.

शिल्पाने पहिल्यांदाच तिचा मुलाचा व्हिडिओ सोशल साईटवर शेअर केलाय असं नाही. याआधी देखील शिल्पाने तिचा आणि पती राजचा वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला होता त्यात विआनसुद्धा त्यांच्यासोबत वर्कआऊट करण्याचा प्रयत्न करताना दिसला होता.  

 have you seen this backflip video of shilpa shetty son viaan  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT