hemangi kavi
hemangi kavi  sakal
मनोरंजन

लोक मला हिणवायचे, म्हणायचे की तुझ्याकडे रंग नाही - हेमांगी कवी

सकाळ डिजिटल टीम

बऱ्याच कलाकारांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. त्यांनी आपले मत किंवा सरकारच्या एखाद्या चुकीच्या धोरणावर टीका करणारे छायाचित्रे किंवा व्हिडिओ सोशल मीडिया पोस्ट केल्यास त्यावर सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रिया येत असतात. आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने 'बाई, बुब्स आणि ब्रा' अशी पोस्ट शेअर केली होती. त्यावरुन मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. तिने आपल्या प्रवासाबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. (Hemangi Kavi says people teasing me and taunting on colour)

हेमांगी कवी (Hemangi Kavi) म्हणते, लोक मला हिणवायचे. म्हणायचे की तुझ्याकडे रंग नाही, कळव्यासारख्या गावी राहते, तुझं भाषेवर प्रभूत्व नाही. हे ऐकत इथपर्यंत पोहोचल्याचे सांगून ती म्हणते ही माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे. आपण कोणाशी स्वतःची तुलना केली नाही. स्पर्धेत उतरले नव्हते. आजपर्यंत जे काम मिळाले, त्यासाठी शंभर टक्के योगदान दिल्याचे ती सांगते. (Marathi Entertainment)

केवळ १५ सेकंदाची रिलही मनापासून करत असल्याचे ती आवर्जून सांगते. ट्रोलिंगचा आधी विचार करायचे. आता त्यास महत्त्व देत नसल्याचे हेमांगी कवी ट्रोलिंगबाबत आपलं मत व्यक्त करते. आपल्या समाजावर सोशल मीडियावर वावरण्याचे संस्कार झाले नसल्याचे ती म्हणते. ट्रोल झाले म्हणून मी माझे अकाऊंट वा काॅमेंट डिलिट केले नसल्याचे ती सांगते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : ''घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी...'', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Share Market Closing:: चढ-उतारानंतर शेअर मार्केट वाढीसह बंद, जाणून घ्या कशी राहिली आजची स्थिती!

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : आरटीई प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज भरता येणार

Pune News : कात्रज घाटाचा मुख्य रस्ता खचल्याने धोका; भिलारेवाडी हद्दीत सातारा रस्त्यावरील घटना

SCROLL FOR NEXT