Hemangi Kavi Share New Video on trollers Comment Instagram
मनोरंजन

Hemangi Kavi Video: 'पब्लिसिटी मिळावी म्हणून ही काहीही करते...', म्हणणाऱ्यांची हेमांगीनं उडवली खिल्ली

हेमांगी कवी ही मुळतः बंडखोर स्वभावाची असल्याकारणानं अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे ट्रोल होताना दिसते.

प्रणाली मोरे

Hemangi Kavi: हेमांगी कवी सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. ती तिथं नेहमी आपले रील,व्हिडीओ,फोटो शेअर करताना दिसते. अनेकदा यावरनं तिला ट्रोल व्हावं लागतं. पण ट्रोलर्सपुढे हार मानेल ती हेमांगी कुठली. ती सुद्धा अनेकदा आपल्यावर वार करणाऱ्या ट्रोलर्सवर हटके पद्धतीनं पलटवार करताना दिसते. नुकताच हेमांगीनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिनं मजेदार पद्धतीनं आपल्यावर ट्रोलर्सनी केलेल्या कमेंटला हायलाइट केलं आहे.Hemangi Kavi Share New Video on trollers Comment

हेमांगी कवीनं नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओत सध्या सोशल मीडियावर ट्रेन्डिंग असलेल्या म्युझिकवर ताल धरला आहे. त्यात दोन फ्रेम मध्ये ती दिसत आहे. एका फ्रेमवर लिहिलेलं दिसतंय की,'ही काहीही करते म्हणून हीला पब्लिसिटी मिळते'.आणि दुसऱ्या फ्रेमवर लिहिलंय की,'पब्लिसिटी मिळावी म्हणून ही काहीही करते'. आणि अर्थात फ्रेमवर जे लिहिलं आहे त्याप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तर भन्नाटच.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

हेमांगीनं व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शन दिलंय की...''हा व्हिडीओ माझ्या इंडस्ट्रीतील काही लोक,माझ्या कुटुंबातील काही लोक,काही खास मित्र-मैत्रिणी,माझे ट्रोलर्स आणि द्वेष करणाऱ्या सगळ्यांसाठी...अलग से...''. हेमांगीच्या या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी लिहिलंय,'तू जे करतेस ते उत्तम आहे,अगदी उगीच नावे ठेवण्यापेक्षा बरे'. तर कुणी लिहिलंय,'तू करत रहा,तू जे करतेस ते सगळ्यांना नाही जमत'.

हेमांगी याआधी तिच्या 'ब्रा..बाई आणि बूब्स' या पोस्टमुळे चर्चेत आली होती. त्यावरनं अनेकांनी तिला नावं ठेवली तर नुकताच काही दिवसांपूर्वी तिनं सुश्मिता सेनसोबत फोटो पोस्ट करत तिला 'माझी दुर्गा' म्हणून संबोधलं होतं. तेव्हा देखील अनेकांनी तिला सुनावलं होतं. हेमांगी कवी ही मुळतः बंडखोर स्वभावाची असल्याकारणानं अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे ट्रोल होताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Post Office Service: आता पोस्टानं पाठवलेलं पत्र किंवा पार्सल लवकर पोहोचणार; पोस्ट ऑफिस नवीन सेवा सुरू करणार, अंमलजावणी कधी?

Latest Marathi News Live Update: मंडणगड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि जंगली श्वापदांच्या त्रासामुळे शेतकरी नाउमेद

Kolhapur Crime: कोल्हापुरात सहा नृत्यांगणांचा जीव देण्याचा प्रयत्न, हाताच्या नसा कापून घेतल्या; कारण आलं समोर

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा नियोजन आराखडा तातडीने प्रसिद्ध करा! राज्याच्या मुख्य सचिवांचे नाशिक प्राधिकरणाला स्पष्ट निर्देश

Pune News: हिंजवडीत दिवाळीची धामधूम; मॉल्स, बाजारपेठा आणि फूड स्ट्रीट्स आयटी कर्मचाऱ्यांच्या गर्दीने उजळल्या!

SCROLL FOR NEXT