Hemangi Kavi shared post about her cameo role in new marathi serial man dhaga dhaga jodte nava on star pravah sakal
मनोरंजन

Hemangi Kavi: छोटीशी भूमिका तरीही.. हेमांगी कवीनं पोस्ट करत केली नव्या भूमिकेची घोषणा..

अभिनेत्री हेमांगी कवीच्या पोस्टनं लक्ष वेधलं..

नीलेश अडसूळ

hemangi kavi : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नावं आहे. अनेक मालिका, चित्रपट, नाटकात तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते.

ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. प्रत्येक विषयावर आपलं रोखठोक मत ती मांडत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सतत काहीना काही पोस्ट करत असते, रील टाकत असते.

अशी ही अभिनेत्री प्रचंड लोकप्रिय आहे. तिला चित्रपट, मालिका या माध्यमातून पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. लवकरच ती एका नव्या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहे. त्याच निमित्ताने तिने एक पोस्ट लिहिली आहे.

(Hemangi Kavi shared post about her cameo role in new marathi serial man dhaga dhaga jodte nava on star pravah)

हेमांगी, या आधी 'लेक माझी दुर्गा' या मालिकेतून झळकली होती. या मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत होती. आता ती पुन्हा एकदा नव्या मालिकेत झळकणार आहे. पण ही भूमिका काहीशी वेगळी आहे. याच विषयी आज ती लिहिती झाली आहे.

हेमांगीने मालिकेतील एक व्हिडिओ शेयर करत लिहिले आहेत की, ''मला Panorama entertainment production मधून phone आला ज्यांच्यासोबत मी ‘तेरी लाडली मैं’ ही हिंदी मालिका केली होती. म्हणाले “तुम्ही cameo करणार का?”. मी म्हटलं “Character चांगलं असेल तर का नाही?”.

''तर ते म्हणाले “हो हो पात्र एकदम भन्नाट आहे म्हणूनच तर तुम्हांला विचारतोय. वकिलाची भूमिका आहे. जी मालिकेच्या नायिकेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते”. मी उत्सुक होत म्हटलं, .. चला मग करूया”. शूटिंग सुरू झालं. एक वेगळीच भूमिका साकारताना मज्जा येतेय.''

पुढे ती म्हणते, ''आजच्या भागात मध्ये माझी एंट्री आहे. तेव्हा पहा ‘गायत्री आत्याला’ ‘मन धागा धागा जोडते’ मध्ये फक्त स्टार प्रवाहवर.. आणि Cameo म्हणजे छोट्या काळा करता साकारलेली महत्वाची भूमिका.'' अशी पोस्ट हेमांगीने शेयर केली आहे.

हेमांगीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार असल्याने तिचे चाहते आनंदित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Murder Case: नातवाला संपवण्यापूर्वी बंडू आंदेकरचा सेफ प्लॅन उघड, नंबरकारी म्हणजे काय?

Agriculture News : ‘नाफेड’चा कांदा बाजारात आल्यास ट्रक जाळू; शेतकऱ्यांचा शासनाला थेट इशारा

Nashik News : 'पाणी वाचवा' मोहीम फक्त कागदावरच? सिडकोतील वारंवार होणाऱ्या जलवाहिनी फुटण्याच्या घटनांवर नागरिकांचा संताप

Thane News: आम्ही स्वतःला जाळून घेऊ! बेकायदा इमारतीमधील राहिवाशांची आर्त हाक; डोंबिवलीत काय घडलं?

ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर 'ही' अभिनेत्री साकारणार पुर्णा आजीची भूमिका? 'त्या' गोष्टीमुळे चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT