hemangi kavi shared post on actress sushmita sen birthday, called her my durga sakal
मनोरंजन

Hemangi Kavi: माझी दुर्गा! म्हणत हेमांगी भावूक.. सुश्मिताच्या पायावर डोकं ठेवत..

अभिनेत्री सुश्मिता सेनच्या वाढदिवासानिमित्त हेमांगी कवीची खास पोस्ट..

नीलेश अडसूळ

hemangi kavi on sushmita sen birthday: हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नावं आहे. अनेक मालिका, चित्रपट, नाटकात तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. प्रत्येक विषयावर आपलं रोखठोक मत ती मांडत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. आता तिची एक पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. ज्यामध्ये तिने चक्क सुश्मिता सेनच्या पायावर डोकं ठेवत तिला 'दुर्गा' म्हंटलं आहे. आज सुश्मिताच्या वाढदिवासा निमित्त तिने ही पोस्ट केली आहे.

(hemangi kavi shared post on actress sushmita sen birthday, called her my durga)

'मिस इंडिया', 'मिस युनिव्हर्स' आणि कित्येक चित्रपट सुपरहिट करणारी सुपरहॉट अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. ती चित्रपटात असो वा नसो या ना त्या कारणाने ती लाईम लाइट मध्ये असे हे नक्की. सतत चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचा आज 47 वा वाढदिवस. लवकरच ती रवी जाधव दिग्दर्शित 'टाली' वेब सिरिज मध्ये झळकणार आहे. या वेब सिरिज मध्ये ती तृतीयपंथी गौरी सावंत ची भूमिका करणार आहे. तिच्या या लुकची सध्या बरीच हवा आहे. अशातच 'टाली' मधील तिच्या गेटअप सोबतच हेमांगी कवीने एक व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये तिने सुश्मिताला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या पोस्ट मध्ये हेमांगीने सुष्मिता साठी 'हॅप्पी बर्थडे माय दुर्गा' असं म्हटल आहे. याआधी हेमांगीने सुष्मितासोबत भेटीचा फोटो शेअर केला होता. त्यात तिने तिचा चेहरा न दाखवता भावना व्यक्त केल्या होत्या. तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, “काल मला माझी दुर्गा भेटली. दगड मातीच्या मूर्तींपेक्षा मी माणसांमध्ये देव शोधते आणि मला भेटतात ही. रवी सरांच्या आगामी web series मध्ये मी जिच्यासोबत काम करतेय ती माझ्यासाठी दुर्गाच आहे. एका अर्थी आज मी जिथे आहे ते तिच्या मुळेच! योग्य वेळ आल्यावर सांगेनच कसं ते! पण ज्याची कल्पना ही केलेली नसते साधं स्वप्न ही पाहिलेलं नसतं जेव्हा ते आपल्या समोर उभं राहतं तेव्हा आपलं काय होत असेल ओ?''

या पोस्टचा नेमका अर्थ काय होता ते समजलं आहे. हेमांगीची दुर्गा दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री सुश्मिता सेन आहे. तिची ही पोस्टही सध्या बरीच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये हेमांगी सुश्मिताला फुलं देते, तिच्या पायावर डोकं ठेवते आणि तिला नमस्कार करते. या व्हिडिओवरुन कळतंय की रवी जाधव दिग्दर्शित 'टाली' या वेब सिरिज मध्ये हेमांगी कवी देखील महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT