hemangi kavi trolled on she called sushmita sen is my durga sakal
मनोरंजन

Hemangi Kavi: सुश्मिता सारख्या लफडेबाज बाईला दुर्गा.. चाहत्याची कमेंट, हेमंगीचे सडेतोड उत्तर

सुश्मिता सेनच्या वाढदिवशी तिला 'दुर्गा' म्हणत हेमांगी कवीने केलेलं कौतुक आता वादाचा विषय झाला आहे.

नीलेश अडसूळ

Hemangi Kavi - Sushmita Sen : 'मिस इंडिया', 'मिस युनिव्हर्स' आणि कित्येक चित्रपट सुपरहिट करणारी सुपरहॉट अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा काल १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने एक खास पोस्ट लिहिली होती. हेमांगीने सुश्मिता सोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिला 'दुर्गा' म्हंटले होते. एवढेच नाही तर हेमांगी तिच्या पायाही पडली. हि बाबा हेमांगीच्या चाहत्यांना खटकली आहे. यावरून त्यांनी हेमांगीला चांगलेच ट्रोल केले आहे.

(hemangi kavi trolled on she called sushmita sen is my durga)

या पोस्ट मध्ये हेमांगीने सुश्मिता साठी 'हॅप्पी बर्थडे माय दुर्गा' असं म्हटल होतं. याआधी हेमांगीने सुष्मितासोबत भेटीचा फोटो शेअर केला होता. त्यात तिने तिचा चेहरा न दाखवता भावना व्यक्त केल्या होत्या. तिने त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, “काल मला माझी दुर्गा भेटली. दगड मातीच्या मूर्तींपेक्षा मी माणसांमध्ये देव शोधते आणि मला भेटतात ही. रवी सरांच्या आगामी web series मध्ये मी जिच्यासोबत काम करतेय ती माझ्यासाठी दुर्गाच आहे. एका अर्थी आज मी जिथे आहे ते तिच्या मुळेच! योग्य वेळ आल्यावर सांगेनच कसं ते!''

रवी जाधव दिग्दर्शित 'टाली' या वेब सिरिज सुश्मिता सेन तृतीयपंथी गौरी सावंतची भूमिका साकारत आहे. तर या वेब सिरिज मध्ये हेमांगी कवी देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रीकरणा दरम्यान हेमांगीला सुश्मिताचे काही चांगले अनुभव आल्याने तिने सुश्मिताला दुर्गा म्हंटलं आहे. केवळ 'दुर्गा' म्हंटलं नाही तर तिने काल शेयर केलेल्या व्हिडिओट दिसते की, हेमांगी सुश्मिताला फुलं देते, तिच्या पायावर डोकं ठेवते आणि तिला नमस्कार करते. पण ही बाब हेमांगीच्या चाहत्यांना मात्र खटकली आहे.

त्याचे कारण आहे, सुश्मिताचे पूर्वायुष्य. सगळ्यांनाच माहीत आहे की सुश्मिता तिच्या चित्रपटांमुळे जेवढी चर्चेत आली त्याहून अधिक चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याची झाली. सुश्मिताने आजवर लग्न केलेले नाही पण तिने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. विशेष म्हणजे आजवर तिचे अनेक बॉयफ्रेंड झाले. आजवर दहाहून अधिक पुरुषांशी तिचे संबंध होते. अगदी नुकतेच मनी लाँड्रींग प्रकरणात अडकलेल्या ललित मोदी सोबत सुद्धा ती सध्या रिलेशनमध्ये आहे. त्यामुळे अशा बाईला दुर्गा म्हणजे अयोग्य आहे, असे मत हेमांगीच्या पोस्ट वर तिच्या चाहत्यांनी व्यक्त केले आहे.

सध्या हेमांगीने ही पोस्ट डिलिट केली आहे. परंतु त्यात एक चाहता म्हणाला होता, 'हेमांगी कवी.. तुमच्या अभिनयाचा मी जबरदस्त फॅन आहे. तुम्ही कोणीतही भूमिका सहज पेलता. पण दोन दिवसांपूर्वी एक फोटो पाहिला. एक हिंदी बी ग्रेड अभिनेत्री समोर तुम्ही नतमस्तक होऊन तिला दुर्गाचा मान दिला. टी अभिनेत्री तुमच्यापेक्षा अभिनयात कच्ची आहे. लफडेबाज.. अव्वल.. गौरी सावंतची भूमिका तिच्यापेक्षा तुम्ही उत्तम निभावली असती. पण हिंदी चित्रपट किंवा वेब सिरिज बोलली की हिंदी स्टार लागतात. ही आपल्या मराठी निर्माते आणि दिग्दर्शक यांचे विकृत कारनामे आहेत. पण प्लीज.. कोणापुढे स्वाभिमान घाण ठेवू नका..'

hemangi kavi trolled on she called sushmita sen is my durga

चाहत्याच्या या कमेंटवर हेमांगीनेही सडेतोड उत्तर दिले आहे. हेमांगीने म्हंटले आहे की, 'कुणाबद्दल ही बोलताना त्या व्यक्तीने काय केलंय ही नक्की पहावं आणि मग बोलावं! एखादी व्यक्ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे (खरतर त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसावं) पण तरीही आवडत नसली तरी बोलताना आपण तारतम्य बाळगायला हवं!' ही पोस्ट काल बरीच चर्चेत होती. पण चाहत्यांच्या अनेक कमेंट येऊ लागल्याने तिने ही पोस्ट सध्या काढून टाकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ

IND vs NZ: अभिषेक शर्माने का पूर्ण केली उपकर्णधार अक्षर पटेलची ओव्हर? पहिल्या T20I असं काय घडलं, जाणून घ्या

Bus-Tanker accident : राष्ट्रीय महामार्गावर बस अन् टँकरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जखमी

IND vs NZ, 1st T20I: १४ षटकार अन् २१ चौकार... भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या! जाणून घ्या कोणते विक्रम रचले

Baramati Elections : बारामतीत उमेदवार यादी जाहीर; जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय गणिते बदलली

SCROLL FOR NEXT