hemangi kavi work with amitabh bachchan in ad shared good news with her fans  SAKAL
मनोरंजन

Amitabh Bachchan Birthday: जिथे शब्द संपतात..! बिग बींसोबत काम करायची संधी मिळाल्याने हेमांगीचं स्वप्न पूर्ण

अमिताभ यांच्या वाढदिवसालाच हेमांगीने ही गूड न्यूज सर्वांसोबत शेअर केलीय

Devendra Jadhav

Hemangi Kavi with Amitabh Bachchan News: हेमांगी कवी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. हेमांगी कवी ही सोशल मीडियावर तिच्या आयुष्याबद्दल विविध अपडेट्स शेअर करत असते.

आज बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने हेमांगी कवीने गुड न्यूज शेअर केली. हेमांगीला चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

(hemangi kavi work with amitabh bachchan in ad shared good news with her fans)

हेमांगीने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करुन ही माहिती सर्वांसोबत शेअर केली. हेमांगीने सोशल मीडियावर अमिताभ यांच्यासोबतचा व्हिडीओ शेअर केलाय.

या व्हिडीओत हेमांगी अमिताभ यांच्यासोबत एका जाहीरातीत काम करताना दिसते. याशिवाय तिने जाहीरातीचे काही BTS क्षण सुद्धा तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत.

ही गूड न्यूज शेअर करत हेमांगी लिहीते, क्या कहॅूं की खुशी, आश्चर्य, घबराहट, shock, respect से है लब सिले हुए! जिथे शब्द संपतात! Happy Birthday श्री अमिताभ बच्चन सर.
उद्या सविस्तर पोस्ट लिहीते. आधी मला स्वतःला स्वीकारायला वेळ द्या.

अशी पोस्ट हेमांगीने लिहीली आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायची संधी मिळाल्याने हेमांगीच्या आनंद गगनात मावेनासा झाला असेल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Partition Measurement : मोठा दिलासा! जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता फक्त २०० रुपयांत; राज्य शासनाचा नवा निर्णय

Devendra Fadnavis vs Ajit Pawar : मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात 'झाडे तोडा', तर उपमुख्यमंत्री पवार म्हणतात 'संतुलन राखा'; तपोवन प्रश्नावरून राजकीय संघर्ष तीव्र

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांना जादू टोण्यासारखा प्रकार करून तलब जिहादमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

Jayakwadi Dam: जायकवाडीचा दिलासा! डाव्या कालव्यात विसर्ग ३०० क्युसेकने वाढ; रब्बीला ‘जीवनदायी’ पाणी

Hubli Accident : बारामतीतील दांपत्याचा हुबळीत मृत्यू; दोन्ही मुले सुखरूप

SCROLL FOR NEXT