Hemangi Kavi's emotional Post for singer KK Instagram
मनोरंजन

'यमा तुला कधीच माफ करणार नाही...!', 'KK' साठी हेमांगी कवीची भावूक पोस्ट

प्रसिद्ध गायक केके च्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडच्या(Bollywood) प्रसिद्ध गायक(famous singer) केके(KK) वयाच्या ५३ व्या वर्षी हृद्यविकाराचा तीव्र झटका आल्यामुळं हे जग सोडून निघून गेला. पण आता यामुळं त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. चाहते म्हणाल तर ते केवळ सर्वसामान्य लोक नाहीत तर यात सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. अनेक बॉलीवूड-मराठी-साऊथ इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी आपापल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केके ला पोस्टच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी 'खूप लवकर गेलास', 'एक रोमॅंटिक आवाज हरवला', 'संगीत क्षेत्रासाठी काळा दिवस' अशा विविध प्रतिक्रिया नोंदवत आपल्या दुःखद भावना मांडल्या आहेत.

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी(Hemangi kavi) जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते,अनेकदा ती विविध विषयांवर व्यक्त होतं असते तिनंही आपल्या इन्स्टाग्रामवर केके च्या आठवणीत एक भावूक पोस्ट(Post) शेअर केली आहे. केके ला तिनं लवकर आपल्याला सोडून गेल्यानं 'Not Fair' असं देखील म्हटलं आहे. या पोस्टमध्ये हेमांगी कवीनं KK नं गाजवलेला नव्वदीचा काळ तिच्या आठवणींच्या माध्यमातून झपकन डोळ्यासमोर आणला आहे. केकेच्या निधनानं भावना अनावर झालेल्या हेमांगीनं थेट यमाला फटकारलं आहे. हेमांगीची ती पोस्ट बातमीत आम्ही जोडलेली आहे.

हेमांगीनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणाली आहे,

''मैत्रीचा, प्रेमाचा सुंदर आवाज गेला! 😢💔
शाळा संपून college मधल्या नवनवीन हवेत ''यारों दोस्ती बडी ही हसीन है आणि पल' या गाण्यांवर तरंगायला लागलो पण कालच्या बातमीने जमिनीवर धापकन खाली पडल्या सारखं झालं. 90s मधल्या लोकांना कळेल मी काय म्हणतेय ते. काही काही गाण्यांनी, आवाजांनी आपल्या आयुष्यातल्या काही क्षणांना व्यापून टाकलेलं आहे. ते गाणं, तो आवाज ऐकला की आपण पुन्हा त्या काळात जातो, time travel सारखं. काल रात्री ते सगळं गोठलं. सुन्न झालं. आमच्या मैत्रीचा, प्रेमाचा बेगरज राजदार अचानक असा घेऊन गेलास, यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही!''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT