Hemant Dhome And Kshiti Jog Marraige Anniversary, Actor post for loving wife shruti Instagram
मनोरंजन

Hemant Dhome:'तेच खुळ्यागत सगळं सुरू आहे ,यातच आलं सग्गळं',लग्नाच्या वाढदिवशी हेमंतची पोस्ट चर्चेत

हेमंत ढोमे आणि क्षिती जोग हे मराठी इंडस्ट्रीतलं खूप क्यूट कपल म्हणून ओळखलं जातं.

प्रणाली मोरे

Hemant Dhome: हेमंत ढोमे सोशल मीडियावर अनेकदा आपलं मतप्रदर्शन करताना दिसतो. तो अनेकदा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्या संदर्भातही पोस्ट करताना दिसतो. अर्थात हेमंत अभिनेता,दिग्दर्शक असण्यासोबत उत्तम लेखक आधी आहे त्यामुळे त्याच्या पोस्टही तितक्याच वाचनीय असतात. हेमंतनं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं आज केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे ते हटके अंदाजात त्यानं तिला लिहिल्यामुळे. त्यानं आपली पत्नी अभिनेत्री क्षिती जोग सोबतचा एक व्हिडीओ शेअर करत तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. (Hemant Dhome And Kshiti Jog Marraige Anniversary, Actor post for loving wife shruti)

हेमंत ढोमेनं क्षितीसोबतचा एक क्युट व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,''दहा वर्षांनतर तोच वेडेपणा, तेच खुळ्यागत सगळं सुरू आहे यातच आलं सग्गळं! खूप खूप शुभेच्छा पाटलीणबाई!

Thank you माझ्यातला, आपल्या नात्यातला चांगुलपणा टिकवुन ठेवल्या बद्दल!
Thank you मला नवा केल्याबद्दल!
Thank you सगळ्यासाठी!''

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

हेमंतनं बायकोला शुभेच्छा देताना शेअर केलेल्या व्हिडीओत ते दोघे कुठेतरी समुद्र ठिकाणच्या पर्यटन स्थळी फिरायला गेले आहेत असं दिसत आहे. समुद्रात बोटीतून फिरण्याचा आनंद घेणारी श्रुती अन् तिला कॅमेऱ्यात कैद करणारा हेमंत तर त्याचबरोबर छोट्या पप्पीला प्रेमानं आंघोळ घालणारे हे दोघं ..असं सारं व्हिडीओतलं आनंदी वातावरण दोघांच्या हॅप्पी मॅरीड लाइफचा दाखला देऊन जातं. हेमंत आणि श्रुती काही दिवसांपूर्वी चर्चेत होते ते त्यांच्या 'सनी' सिनेमामुळे. या सिनेमाचं दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं होतं तर श्रुतीनं सिनेमात अभिनय साकारला होता. ललित प्रभाकरनं 'सनी' ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT