satarcha salman, hemant dhome SAKAL
मनोरंजन

Satarcha Salman: 'सातारचा सलमान' येतोय कल्ला करायला.. हेमंत ढोमेचा नवीन सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली

Devendra Jadhav

Satarcha Salman Marathi Movie News: सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'सातारचा सलमान' या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. टेक्सास स्टुडिओज प्रस्तुत, प्रकाश सिंघी निर्मित हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटतर्फे प्रदर्शित होणार आहे.

‘स्पप्नं बघितली तरंच खरी होतात’ अशी टॅगलाईन असलेल्या या पोस्टरमध्ये सगळे कलाकार एका हूक स्टेपमध्ये दिसत आहेत. साताऱ्यामध्ये राहणाऱ्या एक सामान्य मुलाची ही कथा आहे, जो हिरो बनायचे स्वप्न बघतोय. त्याचे हे स्वप्न पुर्ण होते का, याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.

सातारचा सलमानची घोषणा ४ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ ला झालेली. इतकंच नव्हे २०१९ च्या गणेशोत्सवात सातारचा सलमान सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलेलं. पण नंतर मात्र हा सिनेमा रखडला. गेली अनेक वर्ष सिनेमाबद्दल कोणतीही चर्चा झाली नव्हती. परंतु आज अचानक सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्याने सर्वांच्या मनात आनंद आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून येत्या ३ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सातारचा एक मुलगा हिरो बनण्याचं स्वप्न पाहतो आणि तो त्याच स्वप्न सत्यात उतरवतो का अशी कथा सिनेमात पाहायला मिळणार आहे. पिंपरखेडचा लेखक - दिग्दर्शक हेमंत ढोमेने सिनेमाच्या लेखन - दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे झिम्मा नंतर हेमंत ढोमेचा हा नवा सिनेमा थिएटर मध्ये फुल्ल टू करणार करणार यात शंका नाही. त्यामुळे आता सर्वांना ३ मार्च २०२३ ला सातारचा सलमान सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes: जो रूटचं ऑस्ट्रेलियात पहिलंच शतक! ४० व्या सेंच्युरीनंतर खास सेलिब्रेशनही केलं; पण स्टार्कनेही ६ विकेट्ससह मैदान गाजवलं

Sakal Survey: मराठी संवर्धनासाठी महायुती सरकारचे प्रयत्न कितपत यशस्वी? ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात उलगडलं चित्र

Latest Marathi News Live Update : "मोहोपे" स्टेशनचे नाव "पोयंजे" रेल्वे स्टेशन असे करण्यात येईल

Silent Diseases Alert: 'हे' ५ शांतीत क्रांती करणारे आजार कधीच दाखवत नाहीत लक्षणं; डॉक्टर देतात वेळीच सावध होण्याचा इशारा

Sakal Survey 2025: महायुती सरकारची वर्षपूर्ती! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी कशी होती?

SCROLL FOR NEXT