Sana Khan reveals why she decide to wear hijab.. video viral Google
मनोरंजन

Sana Khan On Hijab: हिजाब परिधान करण्याचं कारण सांगत ढसाढसा रडू लागली सना, ऐकून अंगावर येईल काटा...

सनानं धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी बॉलीवूडला रामराम ठोकला होता अन् हिजाबचाही स्विकार केला होता. सध्या तिचा एक व्हिडीओ जोरदार चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

Sana Khan On Hijab: धर्माच्या मार्गावर स्वतःला झोकून देण्यासाठी सना खाननं बॉलीवूडला अन् सोबत सबंध ग्लॅमर इंडस्ट्रीला राम राम ठोकला होता. सनानं रितसर तशी घोषणा केली होती. तिच्या त्या घोषणेनंतर संपूर्ण मनोरंजन सृष्टी मात्र हादरली होती. सगळेच तिच्या त्या निर्णयाने हैराण झाले होते. पण सना आजही आपल्या निर्णयावर अटळ आहे. सना आजही ग्लॅमरपासून दूर राहिलीय आणि प्रत्येकवेळी ती आपल्याला बुरखा आणि हिजाब परिधान केलेली दिसते.(Sana Khan reveals why she decide to wear hijab.. video viral)

सना खानने जेव्हा ग्लॅमर इंडस्ट्रीला अलविदा म्हटलं तेव्हापासून तिचं आयुष्य पूर्ण बदललं आहे. ती आता धर्माचं काटेकोरपणे पालन करताना दिसते. कधीकाळी बोल्ड ड्रेसेसमध्ये दिसणारी सना खान आज बुरखा आणि हिजाबनं स्वतःला कव्हर करताना दिसते.सना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत चर्चेत आहे,ज्यामध्ये ती आपण हिजाब परिधान करण्याचं का ठरवलं आणि त्याचं महत्त्व सांगताना दिसते आहे. सनाने हिजाब परिधान करण्याचं कारण सांगितलेलं ऐकाल तर अंगावर काटा उभा राहिल.

हिजाबचं महत्त्व सांगताना सना खान सांगते-''जेव्हा कुठल्या मुसलमान पुरुषाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या मृत शरीराला तीन कपड्यांमध्ये लपेटलं जातं. पण जेव्हा कधी कुठल्या मुसलमान महिलेचा मृत्यू होतो तेव्हा तिच्या मृत शरीराला ५ कपड्यांमध्ये लपेटलं जातं''. याचं कारण सांगत सना म्हणाली-''कोणत्याही मृत महिलेच्या शरीराचा आकारही पाहणं अल्लाहला आवडत नाही. आणि त्यामुळेच मुसलमान महिलेचं डोकं देखील कपड्यानं पूर्णपणे झाकलं जातं''. सना पुढे म्हणते-''तुम्हाला नक्कीच असं वाटणार नाही की तु्म्ही ज्या दिवशी हिजाब परिधान कराल तोच तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असावा''.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

सना हे असं बोलून लगेच रडताना दिसते. सना खानच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी लाइक केलं आहे. चाहते सनाचे हे विचार ऐकून तिचं कौतूक करताना दिसत आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की--'खूप छान बहिणी'. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे- 'माशाल्लाह'. तर काही लोक सनाची खिल्ली देखील उडवताना दिसत आहेत.

तसं हे काही पहिल्यांदा घडत नाहीय,याआधी देखील सनाने हिजाब परिधान करण्याविषयी व्हिडीओ शेअर केले आहेत. सनानं एकदा आपल्या एका वक्त्व्यात म्हटलं होतं-''हिजाब परिधान करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. मला पहिलं वाटायचं हिजाब परिधान करणाऱ्या मुली किती क्यूट दिसतात. मी यासंदर्भात ऐकलं आहे. मौलाना याचं महत्त्व रडत रडत सांगत होते आणि ते माझ्या मनाला स्पर्शून गेलं आणि त्यांच्यापेक्षा अधिक मी रडू लागले''.

सनाविषयी बोलायचं झालं तर सध्या ती इस्लाम धर्माचा प्रचार करताना दिसते. तिच्या कितीतरी व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या ती आपला पती अनस सैय्यदसोबत एक आनंदाचे जीवन जगताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

Mumbai News: कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल; केंद्राला भूमिका स्पष्‍ट करण्याचे आदेश

IPL 2026 Auction: वेंकटेश अय्यरची किंमत तब्बल १६.७५ कोटींनी झाली कमी! माजी विजेत्यांनी केलं खरेदी

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : अरूप बिस्वास यांची ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून क्रीडा मंत्री पदावरून मुक्त करण्याची विनंती

SCROLL FOR NEXT