Himesh Reshmiya baddas ravikumar teaser movie,KRK comment Google
मनोरंजन

Himesh Reshmiya च्या 'Badass रविकुमार' ची KRK ने उडवली खिल्ली; म्हणाला,'हा सिनेमा पहायला...'

संगीतकार-गायक असलेला हिमेश रेशमिया मध्ये-मध्ये आपल्या अभिनयाची झलकही चाहत्यांना सिनेमाच्या माध्यमातून दाखवत असतो.

प्रणाली मोरे

Himesh Reshmiya: हिमेश रेशमियाने संगीतकार आणि गायक म्हणून खूप लोकप्रियता मिळवली आहे. यानंतर त्याने अभिनयातही हात आजमावला. सध्या हिमेश सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या इंडियन आयडॉल 13 या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचवेळी, तो त्याच्या आगामी चित्रपट द एक्सपोज फ्रँचायझीच्या 'Badass रविकुमार' मधून कमबॅक करत असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे.(Himesh Reshmiya baddas ravikumar teaser movie)

"आपका सुरूर", " कर्ज "आणि " द एक्सपोज" या चित्रपटामध्ये हिमेश रेशमिया ने प्रमुख भूमिका केल्या होत्या. आणि आता हिमेश रेशमिया परत आपला अभिनय दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे .

हिमेश रेशमियाचा नवीन चित्रपट 'Badass रविकुमार' चा टीझर खूपच दमदार दिसत आहे. अॅक्शन पॅक्ड टीझरमध्ये एंटरटेनमेंट डोसही आहे. हिमेशचा लूकही जबरदस्त दिसत आहे. टीझरमध्ये शोले चित्रपटाच्या गब्बर आ जायेगाच्या डायलॉगप्रमाणे हिमेशच्या आवाजात डायलॉग ऐकू येतो. टीझरमध्ये हिमेश तो मजेशीर संवाद बोलताना दिसत आहे. अर्थात तो टिझर बातमीत जोडलेला आहे.

या चित्रपटाचे पहिले गाणे बटरफ्लाय टिटिलियां आणि ट्रेलर लवकरच प्रदर्शित होईल.चित्रपटाची निर्मिती हिमेश रेशमिया मेलोडीजने केली असून संगीत आणि कथाही हिमेश रेशमियाची आहे . हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

आता हिमेशच्या सिनेमाचा टीझर समोर आल्यावर केआरके नं नेहमीप्रमाणे या सिनेमाची देखील खिल्ली उडवली आहे. त्यानं लिहिलं आहे,''या सिनेमाची निर्मिती करण्यासोबत याला बघायला देखील हिमेशच जाईल. केआरकेनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, Baddas रविकुमार सिनेमाची घोषणा हिमेशनं केली आहे. या सिनेमाला हिमेशनं लिहिलं आहे. संगीत त्याचे आहे,दिग्दर्शन,निर्मिती त्याची आहे. त्यामुळे सिनेमाचा प्रेक्षकही तोच असणार आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT