Shilpa Shetty Holi Instagram
मनोरंजन

Shilpa Shetty: होळी दहन करताना शिल्पा करून बसली 'ही' मोठी चूक,व्हिडीओ पाहताच लोकांचा संताप..शिकवू लागले रीती-रिवाज

शिल्पा शेट्टीचा होळी दहन करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावरनं तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे.

प्रणाली मोरे

Shilpa Shetty Holi 2023: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रानं आपल्या कुटुंबासोबत होळी साजरी करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरनं शिल्पाला जोरदार ट्रोल केलं जात आहे. व्हिडाओत शिल्पा शेट्टीसोबत तिचा पती राज कुंद्रा, मुलगा विवान,मुलगी समिशा आणि शिल्पाची आई देखील दिसत आहे.

शिल्पा शेट्टीनं या व्हिडीओत घरातून नकारात्मक विचारांची शक्ती होळीच्या दिवशी आगीत दहन करण्याविषयी बोलत आहे.

पण मग नेमकं या व्हिडीओत असं काय आहे की लोक शिल्पाला ट्रोल करताना दिसत आहेत.(Holi 2023: Shilpa Shetty holika dahan fans object troll her)

शिल्पा शेट्टी या व्हिडीओत होळी दहना दरम्यान पायात चप्पल घालून दिसत आहे. तसंच..होळी दहनासाठी शिल्पा शेट्टीनं बांबूचा वापर केल्याचं दिसत आहे. याच गोष्टीवर अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एकानं लिहिलं आहे की,'हिंदू धर्मात बांबू जाळण्यास मनाई आहे. हॅप्पी होली'. तर आणखी एकानं लिहिलं आहे,'आधी आपले चप्पल बाजूला काढून ये'.

व्हिडीओत शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा अनेक दिवसानंतर मास्क नं घालता दिसला. राज कुंद्रा पोर्नोग्राफी केसनंतर प्रत्येक ठिकाणी बाहेर जाताना मास्क चेहऱ्यावर घालूनच दिसायचा.

हेही वाचा: परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

शिल्पा शेट्टी कुंद्राच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर अभिनेत्री लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित 'इंडियन पोलिस फोर्स' मध्ये आपल्या नजरेस पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT