Amit Shah praises Rishab Shetty film Kantara esakal
मनोरंजन

Amit Shah : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'हा' चित्रपट अमित शहांना देखील भावला; म्हणाले, मला कळलं की..

मागील वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झालेला दक्षिण दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता.

सकाळ डिजिटल टीम

'कांतारा' या बहुचर्चित सिनेमाचं लेखक, दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केलं आहे. तसंच या सिनेमात त्याच्या अभिनयाची जादूदेखील पाहायला मिळाली आहे.

मागील वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झालेला दक्षिण दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. रिलीज झाल्यानंतर, लोकांमध्ये या चित्रपटाची खूप क्रेझ होती. यामुळं या चित्रपटानं केवळ दक्षिणेतूनच नव्हे, तर हिंदी भाषेतही भरपूर कमाई केली.

'कांतारा' चित्रपटाला लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. हा चित्रपट पाहणाऱ्यांमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचाही समावेश आहे. अमित शहांनी नुकताच हा चित्रपट पाहिल्याचा खुलासा केला. कर्नाटकात 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी अमित शहा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर इथं एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. इथं त्यांनी 'कांतारा'चं तोंडभरुन कौतुक केलं.

अमित शहा काय म्हणाले?

धार्मिक परंपरा, सांस्कृतिक परंपरा दक्षिण कन्नड जिल्ह्यात आढळतात. मी नुकताच 'कांतारा' पाहिला आणि कांतारा पाहून मला कळलं की, हे राज्य परंपरांनं किती समृद्ध आहे. 'कांतारा' हा चित्रपट दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या संस्कृतीची ओळख आहे, असं सांगत शहांनी चित्रपटाचं कौतुक केलं.

'कांतारा' ठरला 2022 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट

2022 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये कांताराचं नाव समाविष्ट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषभ शेट्टीनंच केलं, शिवाय तो या चित्रपटाचा मुख्य अभिनेताही होता. या चित्रपटानं कमाईचे अनेक विक्रम नोंदवले. अवघ्या 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं जगभरात 400 कोटींहून अधिक कमाई केली होती.

ऋषभ शेट्टीनं केली 'कांतारा'च्या प्रीक्वलची घोषणा

'कांतारा' या बहुचर्चित सिनेमाचं लेखक, दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केलं आहे. तसंच या सिनेमात त्याच्या अभिनयाची जादूदेखील पाहायला मिळाली आहे. आता या सिनेमाच्या प्रीक्वलची घोषणा करत ऋषभ शेट्टी म्हणाला, "कांतारा' या सिनेमावर प्रेम केल्याबद्दल सर्वच प्रेक्षकांचे खूप खूप आभार. कांतारा' सिनेमात जे होतं तो कथानकाचा दुसरा भाग आहे. या वर्षात (2023) या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कांतारा'च्या शूटिंगदरम्यानच या सिनेमाच्या प्रीक्वलबद्दल मी विचार करत होतो. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे. लवकरच सिनेमासंदर्भात अधिक माहिती देईल".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिगरबाज! दुखापतग्रस्त असूनही संघासाठी उभा राहिला, शेवटी व्हिलचेअरवरून मैदानाबाहेर गेला, पाहा VIDEO

Latest Marathi News Live Update : ठाण्यात एकाच बॅनर वर झळकले ठाकरे कुटुंब

Sonia Gandhi: सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन सामाजिक न्यायापासून दूर ठेवणारा : सोनिया गांधीं

PM Modi: सरकारच्या योजना शेतकऱ्यांचे भाग्य बदलतील; मोदींकडून प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना दलहन आत्मनिर्भर मिशन’ला प्रारंभ

Natural Glow Facial: दिवाळीत चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा आहे? हे फेशियल आहे परफेक्ट!

SCROLL FOR NEXT