Honey Singh Esakal
मनोरंजन

Honey Singh: 'दीपिकामुळे आज मी'...हनी सिंगने केला खुलासा..

Vaishali Patil

प्रसिद्ध रॅपर हनी सिंगने मागच्या काही काळापासून मनोरंजन विश्वापासून ब्रेक घेतला होता. मात्र तरीही त्याच्या रॅप गाण्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्याच्या चाहत्यांची सख्यां कमी नाही. चाहते त्याच्या नव्या रॅपची वाट पाहत असतात. हनी सिंग त्याचा नवीन अल्बम 3.0 लाँच केल्यानंतर पुन्हा संगीताच्या दुनियेत परतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तो चर्चेत आहे. त्याचा घटस्फोटही झाला असून तो सध्या अभिनेत्री टीना थडानीला डेट करत आहे. अलीकडेच हनी सिंगने मानसिक आरोग्याविषयी बोलताना सांगितले की काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याला त्याच्या या स्थितीवर मात करण्यासाठी खूप मदत केली होती.

Also Read - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हनी सिंगने अलीकडेच एका मुलाखतीत त्याच्या मानसिक आरोग्याविषयी बोलताना अनेक खुलासे केले. त्याचबरोबर तो या परिस्थीतीतुन कसा बाहेर आला याबद्दलही त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले. मात्र अशा परिस्थीतीत त्याची मदत कोणी केली याबद्दलही तो बोलला.

मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजत सताना आणि कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे समजत नसताना दिपिकाने त्याला डॉक्टरांचा सल्ला दिला होता. अक्षय कुमार त्याला फोन करायचा आणि त्यावेळी शाहरुख खाननेही त्याला सपोर्ट केल्याचं त्याने सांगितले.

हनी सिंग पुढे म्हणाला की, 'सर्वांनी मला खूप सपोर्ट केला, जेव्हा माझी प्रकृती खूप बिघडली तेव्हा मला समजत नव्हते की कोणत्या डॉक्टरकडे जावं. त्यावेळी दीपिकाने मला खूप साथ दिली. दीपिकाला वाटलं की मलाही तिच्यासारखीच समस्या आहे, माझं प्रकरण खूप गंभीर होतं. दीपिकाने माझ्या कुटुंबीयांना डॉक्टरांचा सल्ला दिला. मी पण डॉक्टरांकडे गेलो. दीपिकाने माझ्यासाठी खूप काही केले आहे.

तो पुढे म्हणाला, 'शाहरुख भाईने खूप साथ दिली, अक्षय पाजीचे मला फोन आले. मी फोनवरही बोललो नाही. पाच वर्षे मी फोनवर बोललो नाही, तीन वर्षे मी टिव्ही पाहिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

ITI Students: आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आता वैदिक संस्कार अभ्यासक्रम; नेमकं काय शिकायला मिळणार?

साईबाबांनी स्वप्नात दर्शन देताच दूर झाला बॉलिवूड अभिनेत्रीचा रोग ! 'या' दिग्दर्शकाच्या होती प्रेमात

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

SCROLL FOR NEXT