hostel days 4 trailer amazon prime video tvf ahsaas channa SAKAL
मनोरंजन

Hostel Days 4: मजा, मैत्री अन् खूप काही! सुंदर प्रवासाचा अद्भूत शेवट, हॉस्टेल डेज 4 चा ट्रेलर भेटीला

गाजलेली वेबसिरीज हॉस्टेल डेज चा चौथा आणि अखेरचा सीझन भेटीला येतोय

Devendra Jadhav

प्राईम व्हिडिओ, मनोरंजनासाठी अनेक वेबसिरीज आणि सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. या वेबसिरीज आणि व्हिडीओना प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत असतात. आता प्राईम व्हिडीओवर नवीन वेबसिरीज भेटीला येतेय. ती म्हणजे हॉस्टेल डेज 4.

TVF ची निर्मिती असलेल्या हॉस्टेल डेजचा चौथा आणि अखेरचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

(hostel days 4 trailer amazon prime video tvf ahsaas channa)

हॉस्टेल डेझ सीझन ४ ची पहिली झलक

हॉस्टेल डेझ सीझन ४ चा ट्रेलर सहा मित्रांच्या जीवनाची कहाणी सांगतो जे नेहमी एकत्र राहतात आणि ते सर्व कॉलेजच्या शेवटच्या वर्षात आहेत. एकीकडे काही लोक पूर्ण समर्पणाने आपल्या भावी करिअरच्या तयारीत व्यस्त आहेत,

तर दुसरीकडे काही लोक आपल्या जवळच्या मित्रांच्या ग्रुपसोबत सध्याचा काळाचा आनंद घेत आहेत. विविध प्रकारच्या अनुभवांच्या चढ-उतारांमध्ये—किचकट नातेसंबंधांचे निराकरण करणे, नोकरीच्या मुलाखतींना सामोरे जाणे आणि प्रेमळ मैत्री साजरी करणे— अशा गोष्टी या सीझनमध्ये दिसणार आहेत

हॉस्टेल डेझ सीझन ४ फुल्ल टू कॉमेडी असून त्यात ड्रामा आणि हृदयाला भिडणाऱ्या मैत्री दिसून येते. हॉस्टेल डेझ सीझन ४ हा या सुंदर प्रवासाचा खरोखरच एक अद्भुत शेवट आहे.

हॉस्टेल डेज 4 मध्ये असलेले कलाकार

आज TVF च्या हॉस्टेल डेजच्या शेवटच्या सीझनचा ट्रेलर लाँच केला आहे. हॉस्टेल डेझ ही तरुणांमध्ये असलेल्या लोकप्रिय विनोदी वेबसिरीजपैकी एक आहे. मालिकेच्या शेवटच्या सीझनमध्ये मित्रांचा गट प्रौढत्वाच्या पुढच्या टप्प्यात जाण्यापूर्वी त्यांच्या हॉस्टेल जीवनाचा निरोप घेण्यासाठी शेवटच्या वेळी परतताना दिसतील.

(TVF द्वारे निर्मित), 6 भागांची मालिका अभिनव आनंद यांनी दिग्दर्शित केली आहे आणि यात अहसास चन्ना, लव विसपुते, शुभम गौर, निखिल विजय, आयुषी गुप्ता आणि उत्सव सरकार प्रमुख भूमिकेत आहेत, तर फैसल मलिक, गोपाल दत्त, अभिलाष थापलियाल, जैमिनी पाठक आणि देवेन भोजानी असेही लोकप्रिय कलाकार दिसणार आहेत.

कधी रिलीज होणार हॉस्टेल डेझ सीझन 4?

हॉस्टेल डेझच्या या सीझनचा प्रीमियर २७ सप्टेंबर रोजी केवळ भारतातील प्राइम व्हिडिओवर तसेच जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये होईल.

हॉस्टेल डेझ सीझन 4 ही प्राइम मेंबरशिपमध्ये जोडलेली सर्वात नवीन मालिका आहे. भारतातील प्राइम मेंबर्स खरेदीवर बचत, अनेक वैशिष्ठ्यांमध्ये प्रवेश आणि फक्त ₹१४९९ प्रति वर्ष मनोरंजनाचा आनंद घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT