tinnu anand birthday, tinnu anand, amitabh bachchan, shehenshah, kaliya SAKAL
मनोरंजन

Tinnu Anand Birthday: कशी झाली टिनू आनंदमुळे अमिताभ बच्चनची बॉलिवूडमध्ये एंट्री? जाणून घ्या

टिन्नू आनंद आणि अमिताभ बच्चन यांचे खास नाते आहे

Devendra Jadhav

Tinnu Anand and Amitabh Bachchan news: आज टिनू आनंद यांचा वाढदिवस. टिनू आनंद हा असा व्यक्ती आहे ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन यांची सिनेमात एंट्री झाली.

टिन्नू आनंद आणि अमिताभ बच्चन यांचे खास नाते आहे. अगदी दोघांचा वाढदिवस सुद्धा एक मागोमाग एक आहे.

अमिताभ 11 ऑक्टोबरला तर टिनू 12 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा करतात.

(How Tinnu Anand made Amitabh Bachchan's entry into Bollywood?)

कोण आहे टिनू आनंद?

टिनू आनंद यांचा जन्म १९४५ साली झाला. टिनू एक अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आहे. टिनू यांना लेखणीचा वारसा मिळाला आहे. टिनूचे खरे नाव वीरेंद्र राज आनंद आहे.

टिनूचे वडील प्रसिद्ध चित्रपट लेखक इंदर राज आनंद आहेत. टिनूने अजमेरच्या फेमस मेयो कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. टिनू आणि अमिताभ बच्चन यांची अभिनय कारकीर्द एकत्र सुरू होती.

असा मिळाला अमिताभ टिनू आनंदमुळे पहिला सिनेमा...

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा पहिला सिनेमा म्हणजे 'सात हिंदुस्तानी' हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.

परंतु अमिताभ यांना हा पहिला सिनेमा टिनू आनंदमुळे मिळाला हे फार कमी जणांना माहित असेल.

झालं असं होतं की.. सात हिंदुस्तानी चित्रपटात टिनूला पहिल्यांदा कास्ट करण्यात आले होते. परंतु टिनूचे वडील इंदर राज आनंदने टिनू फिल्म इंडस्ट्रीचा भाग बनू नये म्हणून खूप प्रयत्न केले. पण टिनू काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी इंदर राज यांनी

त्याला सत्यजित रे यांच्याकडे पाठवले आणि त्याला अभिनय आणि फिल्ममेकिंगच्या युक्त्या शिकवल्या. सत्यजित रे टिनूला शिकवायला तयार झाले. त्यांनी तसं पत्र पाठवलं.

हे पत्र मिळाल्यानंतर टिनू चित्रपट सोडून कोलकाताला निघून गेला आणि त्या दिवसांत अमिताभ चित्रपटात कामाच्या शोधात होते.

आणि मग टिनूने सोडलेला सिनेमा अमिताभ यांना चित्रपट मिळाला. टिनूने सत्यजित रे यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ५ वर्षे काम केले.

नंतर अनेक चित्रपटात काम केले आणि अनेक चित्रपट केले. व्हिलनच्या भूमिकेत टिनूला सर्वाधिक पसंती मिळाली.

जेव्हा टिनू यांनी स्वतः दिग्दर्शनात उतरायचे ठरवले तेव्ह त्यांनी अमिताभ सोबत टिनू आनंदने अमिताभसोबत 'कालिया', 'शहेनशाह', 'मेजर साब', 'मैं आझाद हूं' असे सुपरहिट सिनेमे केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT