Hrithik Roshan,Sussane Khan
Hrithik Roshan,Sussane Khan Google
मनोरंजन

हृतिक रोशनने चक्क सोशल मीडियावर पूर्वाश्रमीच्या पत्नीची उडवली खिल्ली

प्रणाली मोरे

हृतिकची (Hrithik Roshan) पूर्वाश्रमीची पत्नी सुझेन खानने(Sussane Khan) तिचा एक वर्कआऊट करतानाचा व्हि़ीओ सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे. ज्यावर हृतिकनं दिलेली प्रतिक्रिया जोरदार चर्चेत आहे. आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की या दोघांमध्ये घटस्फोट झाला असला तरी आजही ते भेटतात,मुलांसोबत फिरायला जातात,मुलांसोबत एकत्र वेळ घालवतात,एकत्र सेलिब्रेशनही करतात. त्यामुळे अर्थातच हृतिक किंवा सुझानने एकमेकांसाठी अशी काही प्रतिक्रिया देणं म्हणजे विशेष बातमी नाही. पण तरिही मी का म्हटलं की हृतिकनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. तर त्याला कारण आहे. कारण हृतिक चक्क त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून सुझानच्या त्या व्हिडीओवर हसला आहे. चला जाणून घेऊया सविस्तर काय आहे हृतिकच्या त्या हसण्यामागचं नेमकं कारण.

हृतिक रोशन प्रमाणेच सुझानही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच आपले वर्कआऊट व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. तर हृतिकही तिच्या व्हिडीओवर प्रतिक्रियेच्या माध्यमातून तिला प्रोत्साहन देताना दिसतो. पण सुझानने सध्या जो वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केलेला तुम्ही पाहिला असेल तर त्यात मोठं डम्बेल उचलून ती वर्कआऊट करताना दिसेल. अर्थात स्वतः हृतिक त्यात मास्टर असल्यानं सुझानची डम्बेल उचलताना झालेली दमछाक आणि त्यामुळे तिनं डम्बेल वजनानं भारी असल्यानं वर्कआऊट करताना मारलेला शॉर्टकर्ट हृतिकच्या नजेरतून सुटला नाही.

पण ही खिल्ली तिनं वर्कआऊट करताना घातलेल्या कपड्यांवरनं त्यानं उडवली आहे. त्यानं हसत-हसत म्हटलंय,''हाहाहा,आय लाइक दॅट शॉर्ट्स''. सुझेननं घातलेली शॉर्ट्स ही बास्केटबॉल खेळताना जी शॉर्टस घालतात ती आहे. त्यामुळे हृतिकप्रमाणे आणखी एका नेटकऱ्यानं सुझानच्या त्या व्हिडीओवर म्हटलंय,''आय लाइक बास्केटबॉल शॉर्ट्स''. हृतिक नेहमीच सुझानच्या वर्कआऊट व्हिडीओवर तिला प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिक्रिया देत असतो. तो नेहमीच तिच्यासाठी एखाद्या चिअरलीडरसारखं काम करत असतो. पणया व्हिडीओवरील प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्यानं चक्क तिच्या फॅशन सेन्सवर बोट ठेवल्यासारखँ भासत आहे. आता सुझानं त्याला काय उत्तर देईल देव जाणे. असो. आजही त्यांच्यातलं बॉन्डिंग त्यांच्यातील मैत्रीचं नातं कायम टिकून आहे. कारण लग्नाआधी हृतिक आणि सुझान हे दोघे एकमेकांचे चांगले फ्रेन्ड्स होते. पण लग्नाच्या तेरा-चौदा वर्षानंतर अचानक त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना हृहान आणि हृदान ही दोन मुलं आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan : घाटकोपरची पुनर्रावृत्ती होण्यापूर्वी कारवाई करा, मोठागाव - माणकोली पूलाला लागून अनधिकृत होर्डिंग्ज

Shubman Gill Post: रोहित शर्माशी खरंच बिनसलं? गिलने 'ती' पोस्ट करत चर्चा करणाऱ्यांची घेतली शाळा

Vitamin C : त्वचेसाठी फायदेशीर असणारे ‘व्हिटॅमिन सी’ सीरम घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

Jaydutt Kshirsagar : बीडच्या काका-पुतण्याचा वाद मिटला? जयदत्त क्षीरसागरांच्या मंचावर आमदार संदीप क्षीरसागरांच्या वडिलांची उपस्थिती

Salman Khan: बिश्नोई गँगच्या नावानं सलमानला जीवे मारण्याची धमकी; 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT