hruta durgule 
मनोरंजन

हृता दुर्गुळेने विकत घेतलं स्वत:चं हक्काचं घर; पाहा व्हिडीओ

स्वाती वेमूल

स्वत:च्या हक्काचं घर खरेदी करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. हेच स्वप्न अभिनेत्री हृता दुर्गुळेनं पूर्ण केलं आहे. 'फुलपाखरू' या मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या हृताने तिच्या स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. हृताने ठाण्यात घर विकत घेतलं असून त्याचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या या नव्या घराची झलकसुद्धा दाखवली आहे. 

'लोढा अप्पर ठाणे.. अभिनेत्री म्हणून नाव कमावणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. पण आपलं घर म्हणून ज्याला म्हणता येईल असं हक्काचं घर खरेदी करणं हे माझं स्वप्न होतं. मी हे ठिकाण का निवडलं हे जाणून घ्यायचे असल्यास हा व्हिडीओ नक्की पाहा', असं म्हणत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत हृताने तिच्या लिव्हिंग रुम, बेडरूम, बाल्कनी या सर्वांची झलक दाखवली. तुम्ही तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवलात तर सर्वजण तुमच्यावर विश्वास ठेवतील, असंही ती यात म्हणते. 

हृताने दुर्वा आणि वैदेही या भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'फुलपाखरू' या मालिकेमुळे तिचा चाहतावर्ग वाढला. या मालिकेत हृताने वैदेहीची तर अभिनेता यशोमन आपटेने मानसची भूमिका साकारली होती. हृता आणि यशोमनच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आणि सोशल मीडियावरही दोघांच्या फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

German Silver : चांदीला स्वस्त पर्याय म्हणून जर्मन कारागिरांनी तयार केला सेम टू सेम धातू, पण तुम्ही फसू नका; फरक कसा ओळखाल? जाणून घ्या

Ambegaon News : कपिल काळेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!

White vs Brown vs Multigrain Bread: व्हाइट, ब्राउन की मल्टीग्रेन ब्रेड? वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट? एका क्लिकवर जाणून घ्या!

'नटरंग' नंतर अजय-अतुलसोबत काम का नाही केलं? तुमच्यात भांडण झालं का? रवी जाधव यांनी सांगितलं खरं कारण

B.Ed व LLB सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेला ८ जानेवारीपासून सुरुवात; पाहा अर्जाची अंतिम तारीख काय?

SCROLL FOR NEXT