Hruta Durgule shared post and gives offer to fans to launch her new movie name release date and teaser  sakal
मनोरंजन

Hruta Durgule: हृता दुर्गुळेची प्रेक्षकांना खुली ऑफर! म्हणाली.. तुमचं नाव, नंबर, शहर सांगा आणि..

अभिनेत्री हृताच्या पोस्टनं चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण, जो-तो घेतोय संधीचा लाभ..

नीलेश अडसूळ

Hruta Durgule: मालिका, नाटक, चित्रपट अशा तिहेरी माध्यमात अभिनयाची जादू दाखवलेली आणि तरुणांची विशेष लाडकी असलेल्या हृताने आजपर्यंत अनेक दर्जेदार मालिका केल्या आहेत. 'दूर्वा' या मालिकेतून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं.

त्यानंतर तरुणांच्या पसंतीस उतरलेल्या फुलपाखरू मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांसमोर आली. हि मालिका इतकी गाजली कि बघता बघता हृताचा चाहतावर्ग मोठ्या संख्येने वाढला. त्यानंतर तिने झी मराठी वरील 'मन उडू उडू झालं' हि मालिका केली.

दरम्यान हृताने 'टाइमपास ३' आणि 'अनन्या' असे दोन चित्रपट केले. जय चित्रपटांनी तिला मोठी प्रसिद्धी दिली. अभिनेत्री हृता दुर्गुळे म्हणजे मनोरंजन विश्वातील एक चर्चेत असलेलं नाव. हृताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्या प्रत्येक कलाकृतीला तिचे चाहते अक्षरशः डोक्यावर घेतात. त्याच चाहत्यांसाठी हृताने भन्नाट ऑफर दिली आहे.

हृताचा लवकरच एक नवीन चित्रपट येत आहे. साधारणपणे आपल्याकडे चित्रपटाचं नाव, रिलीज डेट हे कलाकरांकडून एखाद्या मोठ्या सोहळ्यात किंवा सोशल मीडियावर जाहीर केलं जातं. पण हृताच्या या चित्रपटाची तशी कोणतीही अपडेट मिळाली नाही.

त्याचे कारणही तसेच खास आहे. त्या चित्रपताबाबत जाणून घेण्यासाठी हृताने आपल्या चाहत्यांना थेट ऑफर दिली आहे. एक पोस्ट करत तिने ही ऑफर दिली आहे, जाणून घेऊया काय आहे की ऑफर..

या पोस्टमध्ये हृता म्हणते, ''हाय फ्रेंडस्.. माझा एक नवा मराठी सिनेमा लवकरच येतोय, आणि त्यासंदर्भात तुम्हा सगळ्यांना एक धमाल सरप्राइज द्यायचंय!''

''त्या सिनेमाचं नाव, रिलीज डेट तुम्हाला एकदम पर्सनल मध्ये सांगायचं..! माझ्या या नव्या फिल्मची announcement मी नाही तर मायबाप प्रेक्षकांनी म्हणजे तुम्ही करावी अशी यांच्या संपूर्ण टीमची इच्छा आहे.''

''आहे की नाही कमाल!!! तुम्हाला ते टीझर हवं असल्यास मला खाली दिलेल्या आयडीवर ताबडतोब ईमेल करा. आणि मला टॅग करून तुम्ही लॉंच करा माझ्या नव्या सिनेमाचे टीझर.. ईमेल मध्ये या गोष्टी मेन्शन करा..'' अशी पोस्ट हृताने केली आहे.

या पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळत असून लवकरच हृताचा नवा चित्रपट येत असल्याचे या निमित्ताने जाहीर झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शतक झळकावल्यावर विराट कोहलीचा मैदानावर नागीण डान्स, Video होतोय तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : तपोवiनातील वृक्षतोडीविरोधात सीटू संघटना आक्रमक; आंदोलनाला मिळतोय वाढता पाठिंबा

Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन; ज्येष्ठ वकील, माजी राज्यपाल अन्... 'अशी' होती कारकिर्द

Bharat Taxi Launch : झिरो कमिशनसोबत ‘भारत टॅक्सी’ सेवा लॉन्च; मिळणार अल्प दरात राइड्स, जाणून घ्या दर आणि बुकिंग प्रक्रिया

Ashes: मिचेल स्टार्कनं इतिहास घडवला; हॅरी ब्रुकची विकेट घेऊन वसिम अक्रमचा विक्रम मोडला, पाकिस्तानी दिग्गज म्हणाला...

SCROLL FOR NEXT