Hum Aapke Hain Koun Poster And Samantha In 'Pushpa-The Rise' Google
मनोरंजन

Video: 'हम आपके है कौन' मधील 'या' गाण्याचं 'ऊ-अंटावा' व्हर्जन झकास

अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल

प्रणाली मोरे

'पुष्पा'(Pushpa-The Rise) सिनेमाचा फिव्हर काही कमी होण्याचं नाव घेत नाही. गेल्या वर्षात प्रदर्शित झालेला सिनेमा यावर्षातही आपला दबदबा कायम राखून आहे हे प्रकर्षानं दिसत आहे. सिनेमानं आतापर्यंत ३०० कोटींची कमाई केली आहेच. शिवाय सोशल मीडियावर या सिनेमातील संवाद आणि 'सामी-सामी' तसंच 'ऊ-अंटावा' गाण्यांवरील व्हिडीओ रीलचा तर नुसता धो-धो पाऊस पडताना दिसत आहे. बरं,सेलिब्रिटींपासून सर्वासामान्यांपर्यत साऱ्यांनीच याचा आनंद घेतलेला आपण पाहिला. आणि हो,नेहमीच बॉलीवूडशी जवळचं नातं जपलेल्या क्रिकेटवीरांनीही या सिनेमातील संवाद आणि गाण्रयांवर व्हिडीओ रील पोस्ट करून धमाल केलेली आपण साऱ्यांनीच पाहिली असेल. 'पुष्पा-द राइज' सिनेमातील अल्लु अर्जुन(Allu Arjun),रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) या कलाकारांसोबत केवळ एक आयटम सॉंग करणारी समंथा रुथ प्रभूही चाहत्यांच्या मनाला भावली आहे.

आता अभिनेते अनुपम खेर(Anupam Kher) यांनी त्यांच्या सुपर-डुपर हीट 'हम आपके है कौन' सिनेमातील एका गाण्याला 'ऊ-अंटावा' या पुष्पातील गाण्याच्या न्यू व्हर्जंन मध्ये परावर्तित करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 'हम आपके है कौन' मधील सगळीच गाणी सुपरहीट. त्यातीलच 'आज हमारे दिल मै' या गाण्याचे बोल या व्हिडीओत अचानक 'ऊ-अंटावा' होताना पहायला मिळतात. ते फारच मजेदार आहे. यानिमित्तानं व्हिडीओ कॅप्शन देताना अनुपम खेर यांनी दिवंगत अभिनेत्री रिमा यांचं स्मरण केलेलं दिसत आहे. त्यांनी लिहिलंय,'समधनजी इज बॅक'. या व्हिडीओवर नेटकरीही खूश झालेले दिसत आहेत. जुन्यावर नव्याचा मुलामा चढवताना कधीकधी गोष्टी फसतात पण इथे मात्र सुर उत्तम जुळले आहेत. शिवाय 'पुष्पा' फिव्हर आहेच अजुनही,सो कशाला कोण विरोधात बोलतंय. लोकांचं मनोरंजन झालं म्हणजे काम फत्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT