IIFA Awards 2022 Salman Khan insulted host Siddharth Kannan  esakal
मनोरंजन

IIFA 2022: 'सलमान तुला एवढा कसला रे गर्व!' नेटकऱ्यांची सडकून टीका, कारण...

बॉलीवूडचा भाईजान, कित्येकांचा गॉडफादर, दबंग अभिनेता अशी एकापेक्षा एक वेगवेगळी विशेषणं ज्याच्या नावाला लावली जातात त्या (Salman Khan) सलमानची ओळख प्रेक्षकांना नवीन नाही.

युगंधर ताजणे

IIFA Awards 2022 - बॉलीवूडचा भाईजान, कित्येकांचा गॉडफादर, दबंग अभिनेता अशी एकापेक्षा एक वेगवेगळी विशेषणं ज्याच्या नावाला लावली जातात त्या (Salman Khan) सलमानची ओळख प्रेक्षकांना नवीन नाही. तो जसा त्याच्या दबंग अभिनयासाठी ओळखला जातो तसाच तो त्याच्या उद्दामपणासाठीही अनेकांना (Bollywood News) परिचित आहे. आयफा 2022 च्या ग्रँड पुरस्कार सोहळ्यात सलमानचा उद्दामपणा प्रेक्षकांनी पाहिला. त्यावरुन सोशल मीडियावर सलमानवर (Bollywood Celebrity) टीकेचा पाऊस सुरु झाला आहे. सलमान तू नेहमीच इतरांना असा अपमानित का करतो यासारख्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सलमानच्या व्हिडिओवर आल्या आहे. पण असं नेमकं काय घडलं की सलमानवर नेटकरी एवढे भडकले?

सलमान हा यंदाच्या आयफा 2022 सोहळ्याचे होस्टिंग करतो आहे. सोशल मीडियावर त्या इव्हेंटचे फोटो व्हायरल झाले आहेत. यासगळ्यात एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये सलमाननं नेटकऱ्यांना नाराज केले आहे. सलमाननं प्रसिद्ध टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रख्यात होस्ट सिद्धार्थ कन्ननला अपमानित केले आहे. त्या व्हिडिओमध्ये सलमान नोरा फतेही आणि दिव्या खोसला कुमार यांच्यासोबत आहे. त्याचे झाले असे की, सिद्धार्थ जेव्हा सलमानची ओळख करुन देतो तेव्हा सलमाननं त्याला मध्येच थांबवले. आणि त्यानं प्रेसला स्वताची ओळख करुन दिली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यानं सिद्धार्थनं आतापर्यत खूप बोअर केलं असून मी त्याला शांत बसायला सांगतो. अशा शब्दांत त्याचा अपमान केला.

salman trolled

सिद्धार्थनं हा प्रसंग जास्त वेगळ्या पद्धतीनं रंगवण्याचा प्रयत्न केला देखील, मात्र सलमान पुन्हा त्याला म्हणाला, आयफावाले कधीच काही ऐकत नाही. प्रत्येक आयफामध्ये सिद्धार्थला घेऊन येतात. हा नेहमीच प्रेक्षकांना बोअर करतो. सलमानचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. सलमान हा अशा प्रकारे कायमच इतरांना अपमानित करतो. त्याला ते शोभत नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्याला दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्या गर्विष्ठपणाबद्दल दाखलेही दिले आहेत. यापूर्वी देखील त्यानं वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यात कुणाला कसे अपमानित केले हे सांगितले आहे. सध्या सलमानच्या त्या व्हिडिओची सोशल मीडियावर मोठ्य़ा प्रमाणात चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT