Ileana DCruz Baby Bump Photos Bollywood actress  
मनोरंजन

Ileana D'Cruz : लग्न महत्वाचं नव्हे, 'बेबी बंप' फोटोशुट व्हायरल झालंच पाहिजे!

यापूर्वीच्या तिच्या एका पोस्टमधून तिनं प्रेग्नंट असल्याचे सांगत चाहत्यांना धक्का दिला होता.

सकाळ डिजिटल टीम

Ileana DCruz Baby Bump Photos : बॉलीवूडच्या तारका आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य याविषयी त्यांच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते. आपली आवडती अभिनेत्री काय करते, तिच्या घरात सगळे आलबेल सुरु आहे ना अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे चाहत्यांनी हवी असतात. सध्या बॉलीवूड अभिनेत्री आणि बेबी बंप फोटोशूट हा चर्चेचा विषय आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री इलियान डिक्रुझ ही तिच्या बेबी बंप फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. ती आता आई होणार आहे. यापूर्वीच्या तिच्या एका पोस्टमधून तिनं प्रेग्नंट असल्याचे सांगत चाहत्यांना धक्का दिला होता. खरंतर इलियानं लग्न केल्याचे अधिकृतपणे चाहत्यांना न सांगितल्यानं चाहत्यांनी तिच्या त्या पोस्टवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिचं कौतूक केलं आहे तर अनेकांनी तिला लग्नावरुन प्रश्न विचारले आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आता तिनं बेबी बंप फोटोशुटचे काही फोटो शेयर केले असून त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तिनं हाय स्लिट स्लिव्हलेस ब्लॅक कलरच्या गाऊनमधील फोटो शेयर केला आहे. त्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इलियानाच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप काही सांगून जाणारे आहेत. प्रेग्नसीमुळे तिच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो चाहत्यांच्या कमेंट्सचा विषय आहे.

इलियानं तिनं हे फोटो शेयर करुन बाकी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. ते फोटो शेयर करताना इलियानं लिहिलं आहे की, बंप अलर्ट, याशिवाय तिनं चाहत्यांचे आभारही मानले आहे. इलियाला बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं कौतूकही केलं आहे. त्यामध्ये अथिया शेट्टी, सोफी चौधरी, शिवानी दांडेकर या नावाचा समावेश आहे.

इलियानं ही कतरिना कैफचा भाऊ सेमेस्टर मिशेलला डेट करते आहे अशी बातमी व्हायरल झाली होती. मात्र या दोन्ही सेलिब्रेटींनी त्या बातमीविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच व्हायरल झालेल्या त्या बातमीचे खंडनही केले नव्हते. २०१९ मध्ये इलियाना बिग बुलमध्ये दिसली होती. त्यात ती अभिषेक बच्चनसोबत महत्वाच्या भूमिकेत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांसोबत बाचाबाची

SCROLL FOR NEXT