Ileana D'Cruz, Ileana D'Cruz baby bump. Ileana D'Cruz movies, Ileana D'Cruz baby, Ileana D'Cruz boyfriend, Ileana D'Cruz affair Esakal
मनोरंजन

Ileana D'Cruz babymoon: इलियानानं दाखवली होणाऱ्या बाळाच्या वडिलांची झलक... कोण आहे तो? फोटो व्हायरल

Vaishali Patil

Ileana D'Cruz Babymoon Pics: इलियाना डिक्रूझ सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. ती तिच्या आयुष्यातील या फेजचा आनंद घेत आहे, ज्याची एक झलक ती सोशल मिडियावर नेहमीच सोशल मिडियावर शेयर करत असते.

तिनं काही दिवसांपुर्वीच याचा खुलासा केला होता. ही बातमी समोर आल्यानंतर सगळेच चक्रावून गेले.

अलीकडेच, इलियाना डिक्रूझने तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती ब्लॅक ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करत आहे.

इलियाना डिक्रूझने या फोटोंवर प्रेम व्यक्त केले. दरम्यान, इलियाना डिक्रूजचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

ही क्लिप शेअर करत इलियाना डिक्रूजने सांगितले की, ती बेबीमूनसाठी निघाली आहे.

Ileana D'Cruz babymoon
Ileana D'Cruz babymoon

इलियानाने तिचे इंस्टाग्रामवर अपडेट टाकलं आहे. केले आणि एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या बेबीमून डायरीची पहिली झलक दिली.

ती कुठे गेली आहे हे अद्याप स्पष्ट नसलं तरी इलियाना डिक्रूझ परदेशात गेल्याचं दिसतं. हे शेअर करत इलियाना डिक्रूझने लिहिले, बेबीमून.

'बेबीमून'च्या पहिल्या क्लिपमध्ये समुद्र किनाऱ्याची झलक पाहायला मिळत आहे. दुसऱ्या क्लिपमध्ये ड्रिंक्सचे ग्लास दिसत आहेत.

तिसर्‍या भागात अभिनेत्री आणि तिच्या जोडीदाराचे हात दिसत आहे. मात्र हात पकडलेला व्यक्ती कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. 'बेबीमून' दरम्यान काढलेल्या फोटोमध्ये दोघांनीही त्यांच्या अंगठ्या फ्लॉंट केल्या होत्या. हा फोटो सोशल मिडियावर खुपच व्हायरल झाला आहे.

एप्रिलमध्ये तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केल्यापासून, इलियानाने तिच्या बाळाच्या वडिलांच्या ओळखीबद्दल मौन बाळगलं आहे. तिच्या 'बेबीमून'वर तिच्यासोबत कोण आहे हे तिने उघड केले नसले तरी, ही पहिलीच वेळ आहे की तिने तिच्या बाळाच्या वडिलांबद्दल काही माहिती दिली आहे.

रिपोर्ट्सनुसार, इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. जेव्हा दोघेही कतरिना आणि विकी कौशलसोबत त्यांच्या मालदीव ट्रिपवर वेळ घालवताना दिसले तेव्हा त्यांच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या.

काही काळापूर्वी इलियाना डिक्रूज ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू नीबोनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

दोघांचे आधीच लग्न झाल्याची अफवा पसरली होती, मात्र 2019 मध्ये दोघांचं ब्रेकअप झाल्याचं उघड झालं.

इलियाना डिक्रूझ सध्या चित्रपट जगतापासून दूर आहे.चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT