Ilena D cruz baby bump photo shoot viral pregnancy  
मनोरंजन

Ileana D'Cruz Baby Bump : बाळंतपणाला अजून बराच वेळ, बेबी बंपचा सगळा खेळ!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रुझ ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोंमुळे चर्चेत असते.

युगंधर ताजणे

Ilena D cruz baby bump photo shoot viral pregnancy : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रुझ ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोंमुळे चर्चेत असते.सध्या इलियानाची गुड न्यूज चाहत्यांच्या कौतूकाचा विषय आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून तिनं बेबी बंपचे फोटो शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

इलियानाच्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहे. इलियाना तुला बाळंतपणापेक्षा बेबी बंप फोटोंविषयी जास्त कुतूहल असल्याचे दिसून आले आहे. एप्रिलमध्ये एलियानानं तिची गुड न्यूज दिली होती. त्यानंतर तिनं पुढील काही दिवस बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. वर्क आऊट करतानाचे ते फोटो चाहत्यांच्या खास प्रतिक्रियेचा विषय होता. त्या फोटोंवरुन इलियाना ही प्रेग्नंसी इंजॉय करत असल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

त्या फोटोंमध्ये इलियानाच्या चेहऱ्यावर ग्लो आणि तो आनंद दिसून येतो आहे. इलियानं वेगवेगळ्या अँगलमधून फोटो काढले असून त्यावर नेटकऱ्यांनी तिला भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आता इलियाननं आरशासमोर बेबी बंपचे फोटो शेयर केले आहे. एवढं सगळं असूनही इलियाननं अजुनपर्यत ती कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे काही सांगितलेलं नाही. तिनं ८ एप्रिल रोजी तिच्या गुड न्यूज विषयी सांगितले होते.

गेल्या काही काळापासून इलियाना ही अँड्रयु निबोनला डेट करत होती. मात्र २०१९ मध्ये त्यांचे ब्रेक अप झाले. त्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया इलियानाला दिल्या आहे. काहींनी असं म्हटलं आहे की, कतरिनाच्या भावाला सेबेस्टियन लॉरेंट मिशेलला इलियाना डेट करत असल्याची चर्चा आहे. मालदीव व्हॅकेशनमध्ये त्यांचे काही फोटो व्हायरल झाले होते. कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनमध्ये करण जोहरनं इलियानाला तो प्रश्न विचारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

मोठी बातमी : भारत-बांगलादेश मालिका स्थगित; रोहित शर्मा, विराट कोहली यांना ऑक्टोबरपर्यंत मिळाली सुट्टी

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

SCROLL FOR NEXT