Ind Vs Pak Asia Cup 2023 Urvashi Rautela Insta Story esakal
मनोरंजन

Ind Vs Pak Asia Cup 2023 : उर्वशीच्या इंस्टाच्या स्टोरीला 'त्या' पाकिस्तानी खेळाडूचा फोटो, लग्नाची घातली होती मागणी!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेलिब्रेटी उर्वशी रौतेला चर्चेत आली आहे. त्याचे कारणही खास आहे.

युगंधर ताजणे

Ind Vs Pak Asia Cup 2023 Urvashi Rautela Insta Story : आशिया कप २०२३ च्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारतानं लाखो चाहत्यांची निराशा केली आहे. ज्या सामन्याची प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहते वाट पाहत असतात त्या सामन्यात पाकिस्ताननं भारताच्या सलामीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले आहे.

सोशल मीडियावर आता भारताच्या सलामीच्या फलंदाजांवर नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यात रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या सगळ्यांनी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात निराशा केल्याचे दिसून आले आहे. अशातच बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेलिब्रेटी उर्वशी रौतेला चर्चेत आली आहे. त्याचे कारणही खास आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली

यापूर्वी उर्वशी ही भारताचा प्रसिद्ध फलंदाज ऋषभ पंतमुळे चर्चेत आली होती. ऋषभ आणि तिच्या अफेयरच्या बातम्याही व्हायरल झाल्या होत्या. नेटकऱ्यांनी त्यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. त्यातच उर्वशीच्या काही फोटोंवर पाकिस्तानच्या त्या वेगवान गोलंदाजानं प्रतिक्रियाही दिली होती. त्यावर उर्वशीनंही त्याला उत्तर दिले होते. त्याचीही बराचकाळ चर्चा रंगली होती.

आता उर्वशीनं ज्या पाकिस्तानी गोलंदाजानं भारताच्या सलामीवीरांना बाद केले त्याचा फोटो इंस्टाच्या स्टोरीवर शेयर केला आहे. तो फोटो पाहताच नेटकऱ्यांचा संताप झाला आहे. त्यावर त्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे. उर्वशी तुझ्या इंस्टाच्या स्टोरीला पाकिस्तानच्या नसीम शाहचा फोटो का ठेवला अशी विचारणाही केली आहे. त्यामुळे आता उर्वशी मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी याच नवीन शाहनं उर्वशीला लग्नासाठी मागणीही घातली होती. मात्र हे त्यानं गमतीत केले होते. त्याचे कारण असे की, उर्वशीनं त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचवेळी त्यानं हसत थोड्या थट्टा मस्करीच्या अंदाजात उर्वशीला लग्नासाठी प्रपोझ केल्याचे दिसून आले होते. आता मात्र उर्वशीच्या त्या स्टोरीच्या फोटोमुळे तिच्यावर टीका होताना दिसून आले आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्मावर देखील नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा हा चांगल्या कामगिरीसाठी झुंजत असल्याचे दिसून आले आहे. आजच्या सामन्यात तो चमकदार कामगिरी करेल असे बोलले जात होते मात्र त्यानं पुन्हा एकदा नेटकऱ्यांची निराशा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Latest Marathi Breaking News Live Update: पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार

SCROLL FOR NEXT