IND vs Pak Virat Kohli  esakal
मनोरंजन

IND vs Pak: शेवटी कोहलीच खेळला! समीर चौगुलेंना मिळालं उत्तर

भारतानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला आहे. अखेरच्या चेंडूपर्यत झालेल्या लढतीत भारतानं पाकिस्तानला नमवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Samir Chaugule News: भारतानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला आहे. अखेरच्या चेंडूपर्यत झालेल्या लढतीत भारतानं पाकिस्तानला नमवले आहे. एक वेळ अशी होती की, हा सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या ताब्यात होता. काही झालं तरी भारताला विजयी होऊ द्यायचे नाही असा मनसुबा असणाऱ्या पाकिस्तानच्या गोलंदाजीनं भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते. मात्र यासगळ्यात विराट कोहलीच्या खेळीनं भारताला विजय मिळवून दिला आहे.

भारत - पाकिस्तान सामना हा नेहमीच हाय व्होल्टेज म्हणून ओळखला जातो. त्यात गेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारताचा केलेला पराभव हा भारताच्या चांगल्याच जिव्हारी लागला होता. अशातच आजचा सामना काही करुन भारताला जिंकून प्रेक्षकांना दिवाळींच मोठं गिफ्ट देखील द्यायचं होतं. त्यांनी ते करुन दाखवलं. यासगळयात हास्यजत्राचे कलाकार समीर चौगुले यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

चौगुले हे पहिल्यांदाच भारत पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी मेलबॉर्नला गेले आहेत. त्यांनी तिथून इंस्टावर एक पोस्ट शेयर करुन आज कोहली खेळणार का असा प्रश्न विचारला होता. आता त्यांना त्यांच्या त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. कोहलीनं 82 धावांची नाबाद खेळी करुन भारताला विजय मिळवून दिला. श्वास रोखून ठेवणाऱ्या या सामन्यान काही वेळ काळजाचा ठोका चुकवला होता. त्यात भारताची सरशी झाली आहे.

चौगुले यांनी आपल्या भारत पाकिस्तान सामन्याचा आनंद घेत असल्याचे सांगत त्याची कमालीची उत्सुकता असल्याचे म्हटले होते. आता त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत कौतूकाचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT