मनोरंजन

Indian Idol 12: सायली कांबळे 'या' व्यक्तीला करतेय डेट

नेटकरी आणि इंडियन आयडॉल १२च्या स्पर्धकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

स्वाती वेमूल

'इंडियन आयडॉल'चं बारावं Indian Idol 12 पर्व चांगलंच गाजलं. हे पर्व काही दिवसांपूर्वीच संपलं. मात्र त्यातील स्पर्धक अजूनही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. आपल्या गायनकौशल्याने या शोमधील स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. आता सोशल मीडियावर या शोमधील स्पर्धक सायली कांबळे Sayli Kamble तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सायलीने नुकताच तिच्या प्रियकरासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. शोमध्ये असताना तिचं नाव निहालसोबत जोडलं गेलं होतं. आता सायलीने तिच्या खऱ्या प्रियकरासोबतचा फोटो पोस्ट करत निहालसोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

प्रियकर धवलसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट करत सायलीने कॅप्शनमध्ये प्रेमाची कबुली दिली आहे. 'चलो जी साफ साफ कहती हूँ, इतनी सी बात है.. मुझे तुमसे प्यार है' या गाण्याच्या ओळी तिने कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत. सायलीने हा फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर तो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. इंडियन आयडॉल १२च्या स्पर्धकांनीही सायलीच्या फोटोवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अंजली गायकवाड, स्पृहा जोशी यांनी कमेंट्समध्ये हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. या पर्वाच्या अंतिम सोहळ्यात सायलीने तिसरं स्थान पटकावलं होतं. शोमध्ये तिच्या गायनाचं खूप कौतुक झालं होतं.

'इंडियन आयडॉल १२' विविध कारणांमुळे सतत चर्चेत होतं. या शोमध्ये हजेरी लावणाऱ्या पाहुण्या कलाकारांना स्पर्धकांचं कौतुक करायला सांगितल्याचे आरोप निर्मात्यांवर करण्यात आले होते. सूत्रसंचालक आदित्य नारायणने या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

आजचे राशिभविष्य - 14 मे 2026

Sattu Buttermilk Recipe: उन्हाळ्याच्या कडाक्यात शरीराला आतून थंडावा देणारं सुपर देसी ड्रिंक! घरच्या घरी झटपट बनवा 'सत्तूचं ताक'

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

SCROLL FOR NEXT