jackie shroff 
मनोरंजन

टायगरचे बोलणे ऐकून जग्गू दादा झाला भावुक; पाहा VIDEO

सकाळन्यूजनेटवर्क

हिंदी रियालीटी शो 'इंडियन आयडॉल १२' मधील स्पर्धक सध्या प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. या शोच्या विकेंडच्या विशेष भागत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफने म्हणजेच 'जग्गू दादा'ने उपस्थिती लावली. यावेळी जॅकीला स्पेशल गेस्ट म्हणून शोमध्ये बोलवण्यात आले होते. जग्गू दादा या शोमध्ये मज्जा-मस्ती करताना दिसला. त्याचा हा मिश्कील अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. या शोमधील स्पर्धक आशिष कुलकर्णीने जॅकीच्या आयना चित्रपटातील 'गोरिया रे गोरिया रे' हे  गाणे सादर केले. 

शोमध्ये जॅकीने त्याच्या आयुष्यातील काही मजेदार किस्से सांगून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शोमध्ये आदित्य नारायणने जॅकीला एक खास व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओमध्ये जॅकीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्यासाठी खास मेसेज दिला. शोमध्ये जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफने जॅकीबद्दल एक खास आठवण सांगितली की,'तुम्हा सगळ्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की,  मी जेव्हा जॅकीला भेटले तेव्हा मी 13 वर्षाची होते. मी आणि जॅकी एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये भेटलो. तेव्हा आमचे फक्त 2 मिनीट बोलणे झाले होते. मग मी घरी येऊन माझ्या आईला सांगितले होते की, मी आज ज्या माणसाला भेटले त्याच्यासोबत लग्न करणार आहे.

या भेटीच्या 3 वर्षानंतर मी पुन्हा जॅकींना पाहिले त्यानंतर आम्ही बोलायला सुरूवात केली. आम्ही बाहेर फिरायला सुरूवात केली. त्यांच्यासोबत लग्न करण्याचा माझा निर्णय बरोबर होता. मी स्वत:ला नशिबवान समजते की मला जॅकी नवरा म्हणून मिळाला. तो या जगातील सगळ्यात चांगला नवरा आहे.' 

हिंदी चित्रपट सृष्टीताल प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफने देखील आपल्या वडिलांसाठी शोमध्ये एक खास आठवण व्हिडीओमधून सांगितली. यावेळी टायगर म्हणाला,'सगळ्यात आधी शोमधील सर्व स्पर्धकांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा. सगळ्या परिक्षकांना माझा नमस्कार. मी एवढच सांगू इच्छितो डॅड, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. आयुष्यात माझं एकच ध्येय आहे की मी प्रत्येक दिवशी तुम्हाला अभिमान वाटेल असं काही तरी करेन आणि मला वाटतं आहे की, मी असं करू शकत आहे'. हा संदेश ऐकून जॅकी भावुक झाला आणि त्याने इंडियन आयडॉलचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : माझ्या मुलीसारखी, पण चुकी झाली! एकटीला पाहून भररस्त्यात छेड काढली, तरुणीनं धडा शिकवताच धरले पाय

Pune Metro : 'कारशेड'साठी जागाच नाही! पुणे मेट्रोच्या चौथ्या टप्प्यात मोठा अडथळा; CWPRS ने प्रस्ताव फेटाळला

Jayant Patil vs Gopichand Padalkar : ‘...राव तेवढा ढापलेला कारखाना परत द्या’ भर चौकात लावला पोस्टर, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद टोकाला

काठीला कापड गुंडाळल्यासारखी दिसते... बारीक असल्याने 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला हिणवलं; अनुभव सांगत म्हणाली-

Pune Redevelopment : लोकमान्यनगरचा पुनर्विकास राजकीय आणि 'म्हाडा'च्या हस्तक्षेपामुळे थांबला! नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT