Gurpreet Gill Maag claimed 6 millian $ to Lalit Modi esakal
मनोरंजन

'या' पोरीने ललित मोदीची खोड मोडली होती, भरावा लागला ६ कोटी दंड

गुरप्रितने लंडन कोर्टात केलेल्या मोदीविरूद्धच्या फसवणुकीच्या दाव्याचा पाठपुरावा करण्यास लंडन कोर्टाने मात्र नकार दिला होता.

सकाळ डिजिटल टीम

सध्या ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या लव अफेअरच्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहेत. सुष्मितासोबतच्या नात्याने चर्चेत आलेल्या ललित मोदीची याआधी मॉडेल आणि गुंतवणूकदार गुरप्रित गिल मागने चांगलीच खोड मोडली होती. त्याच्याविरोधात ब्रिटन न्यायालयात याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता.त्यानंतर ललित मोदीला तब्बल ६ कोटींची रक्कम परतफेड म्हणून मोजावी लागली होती.

या खटल्याचा निकाल ललित मोदीच्या विरोधात लागला होता.त्यानंतर गुंतवणूकदार असलेल्या गुरप्रित गिलला ८ लाख डॉलरची मोठी रक्कम परत करण्याचे आदेश ललित मोदीला देण्यात आले होते.गुरप्रितने लंडन कोर्टात केलेल्या मोदीविरूद्धच्या फसवणुकीच्या दाव्याचा पाठपुरावा करण्यास लंडन कोर्टाने मात्र नकार दिला होता.

ललित मोदीने गुरप्रितला कँसर उपचार उपक्रमात १० लाख डॉलर गुंतवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप गुरप्रितने केला होता.या रकमेतील २ लाख डॉलर तिला परत केल्या गेले आणि उर्वरीत रकमेसाठी तिला कोर्टात जावे लागले.याप्रकरणी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा संस्थापक असणाऱ्या मोदीवर फसवणूक केल्याबद्दल लाखो डॉलर्सची मागणी करत मागने न्यायालयात कायदेशीर आव्हान दाखल केले होते.

न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार गुरप्रितच्या स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) 'क्वान-तुम केअर लिमिटेडला' मोदीच्या कँसर उपचारासाठीच्या 'आयन केअर'साठी गुंतवणूक करण्याची ऑफर देण्यात आली होती.हॉटेलमध्ये झालेल्या भेटीमध्ये माग आणि तिच्या नवऱ्याला या प्रकल्पात अनेक प्रसिद्ध व्यक्ती मार्गदर्शक म्हणून काम करण्यास सहमत आहेत असे सांगण्यात आले होते.त्याचे पुरावेही त्यांनी न्यायालयात सादर केले होते.मात्र त्यानंतर त्यांना त्यांची फसवणूक केल्याची कळताच न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst Reason : उत्तरकाशीमध्ये ढगफुटी का झाली? धक्कादायक कारण आलं समोर, शास्त्रज्ञ म्हणाले लवकरच भारतात...

Jupiter Transit 2025: गुरुंचा कर्क राशीत प्रवेश; या ४ राशींवर ४९ दिवसांत धन, यश आणि संधींचा वर्षाव!

Ravikiran Ingavle : रविकिरण इंगवलेंसह ८० जणांवर गुन्हा, परवाना न घेता रॅली काढल्याचा परिणाम

Mumbai Kabutar Khana : कबुतरांमुळे इमारतींवर रासायनिक परिणाम, मुंबई शहराच्या अभ्यासातील माहिती; ३,५०० कबुतरे एकाच ठिकाणी

Latest Marathi News Updates Live : माधुरीचा ताबा घेण्याचा आमचा प्रयत्न नव्हता, वनताराने दिली मुख्यमंत्र्यांना माहिती

SCROLL FOR NEXT