मनोरंजन

इंदोर पोलिसांची विकी कौशलला क्लीन चिट, नंबर प्लेट चोरी प्रकरण

बॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता विकी कौशल (bollywood actor vicky kaushal) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Vicky Kaushal: बॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता विकी कौशल (bollywood actor vicky kaushal) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्याचं आणि कतरिना कैफचं लग्न बॉलीवूड चाहत्यांसाठी मोठी पर्वणी होती. चाहत्यांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर त्याच्यावर इंदोरमधील एका व्यक्तीनं नंबर प्लेट चोरीचा आरोप केला होता. त्यामुळे विकी कौशल हा चर्चेत आला होता. दोन जानेवारीला इंदोर पोलिसांनी (Indore police) त्या तक्रारदाराची तक्रार दाखल करुन घेतली होती. त्यानुसार त्यांनी तपासाला सुरुवातही केली. तपासातून हाती आलेल्या माहितीनुसार विकी कौशलला इंदोर पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे.

एएनआयनं (ani) दिलेल्या माहितीनुसार इंदोर पोलिसांनी विकीला क्लीन चीट दिली आहे. विकी कौशलच्या एका चित्रपटामध्ये त्यानं वापलेल्या दुचाकीचा नंबर दुसऱ्या व्यक्तीच्या दुचाकीचा होता. असं तक्रारीत म्हटले होते. त्या तक्रारीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि त्या प्रकरणाचा तपासही सुरु करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांचे असे म्हणणे होते की, वाहनांच्या नंबरप्लेटमुळे गैरसमज निर्माण झाला होता. त्याचं झालं असं की. विकी कौशलच्या एका चित्रपटातील दृश्यामध्ये तो अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोबत बाईक चालवत होता. त्यांचे हे गाडी चालवण्याचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते.

याबाबत ANI शी बोलताना तक्रारदार जयसिंग यादव (Jaysingh Yadav) यांनी सांगितलं होतं, "चित्रपटाच्या सीन्समध्ये वापरण्यात आलेला वाहन क्रमांक माझ्या वाहनाचा आहे. चित्रपट युनिटला याची माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही पण हे बेकायदेशीर आहे. ते परवानगीशिवाय ती नंबर प्लेट वापरू शकत नाहीत. मी स्टेशनवर निवेदन दिले आहे. या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे." त्यानंतर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahyadri Tiger Reserve : वाघांची डरकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार, आणखी आठ वाघ वास्तव्यास येणार; केंद्र-राज्य शासनाचा निर्णय

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT