International Dog Day News  esakal
मनोरंजन

International Dog Day: 'तू तर उर्फीसारखाच अतरंगी!' कुत्र्याचं अजब 'ड्रेसिंग'

टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या हटके फोटोशुटमुळे नेहमीच वादात सापडणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद.

युगंधर ताजणे

International Dog Day 2022: टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या हटके फोटोशुटमुळे नेहमीच वादात सापडणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. उर्फी ही बऱ्याचदा तिच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलमुळेच चाहत्यांच्या नजरेत भरते. तिच्या (Tv entertainment news) त्या फोटोंना चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया मिळत असल्याचे दिसून आले आहे. उर्फीनं आतापर्यत ज्या गोष्टींच्या, वस्तुंच्या (bollywood actress) मदतीनं फॅशन करता येईल तशी फॅशन केली आहे. त्याला चाहत्यांनी दादही दिली आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रेटीला वेगळ्या अंदाजात पाहणं त्यांना आवडत असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन पाहायला मिळते. आता एका कुत्र्याचं फोटोशुट हे चर्चेत आले आहे. त्याचं ते ध्यान पाहून नेटकऱ्यांनी त्याची तुलना उर्फीसोबत केली आहे.

आपल्याला कुणी काहीही म्हटले तरी चालेल त्याची पर्वा न करता वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशुट करणाऱ्या उर्फीच्या फोटोंवर येणाऱ्या कमेंट्स हा देखील नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या डॉगी फोटोशुटची प्रेरणा ही उर्फी असल्याचे म्हटले आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कुत्र्यानं अंगात पोतं घालून, कधी झाडांची पानं लावून केलेलं फोटोशुट नेटकऱ्यांच्या नजरेत भरलं आहे. त्यांनी त्याचं कौतूक करताना उर्फीचा आधार घेतला आहे. तू तर एकदम उर्फीसारखाच दिसतो असे त्यांनी म्हटले आहे.

इंस्टावर तो फोटो व्हायरल झाला असून त्याला आतापर्यत नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. उर्फीनं देखील तो व्हिडिओ शेयर केला आहे. तिनं त्या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की, तुम्ही तुमचा वेळ कोणत्याही गोष्टींसाठी वाया घालवू नका. एकप्रकारे आपल्यावर टीका करणाऱ्यांना तिनं टोमणा मारला आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीनं देखील पोत्याचा ड्रेस परिधान करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्फी ही स्वताच तिचा ड्रेस डिझाईन करते. तिला फॅशनची चांगली समज आहे. असं म्हटलं जातं. मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी ती दिल्लीमध्ये फॅशन डिझायनरमध्ये काम करत असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT