Yoga Day news
Yoga Day news  esakal
मनोरंजन

Yoga Day 2022: ह्रतिकच्या आईचं पाण्यात 'पद्मासन', नेटकरी थक्क!

युगंधर ताजणे

International Yoga Day 2022 आंतरराष्ट्रीय योगा डे च्या निमित्तानं वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याचे महत्व पटवून दिलं आहे. (Entertainment News) बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटी या नेहमीच फिटनेसविषयी भरभरुन बोलताना दिसतात. आज योगा डे च्या निमित्तानं त्यांनी सोशल (Bollywood celebrities) मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना योगदिनाचं महत्व सांगितलं आहे. यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशनच्या 67 वर्षीय आईचा पाण्यात योगा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंटस देखील केल्या आहेत. काहींनी तर (Hrithik Roshan) मलायकाला काय पाहता ह्रतिकच्या आईचा योगा पाहा अशाप्रकारची गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलीवूडमध्ये ज्या अभिनेत्री फिटनेस फ्रिक म्हणून ओळखल्या जातात त्यामध्ये शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, करिना कपूर यांची नावं घ्यावी लागतील. याशिवाय (Bollywood News) प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण, त्याची आई आणि पत्नी यादेखील त्यांच्या फिटनेससाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिल्या आहेत. योग दिनाच्या निमित्तानं ह्रतिकनं त्याच्या 67 वर्षीय आई पिंकी रोशन यांचा एक भन्नाट व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये त्या पाण्यात योगा करताना दिसत आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर अनेकजण थक्क झाले आहेत. पाण्यात आसन घातल्यानंतरत्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस दिल्या आहेत.

योग दिनाचे औचित्य साधून अनेकांनी आपल्या फिटनेसविषयी नेटकऱ्यांना सांगितलं आहे. ह्रतिक रोशनची आई फिटनेसच्याबाबत अनेक तारकांना मात देणाऱ्या ठरल्या आहेत. त्या 67 वर्षांच्या असून त्या आपल्या फिटनेसविषयी अधिक दक्ष असल्याचे दिसुन आले आहे. या वयातही त्यांचा योगा करतानाचा उत्साह हा तरुणांना लाजवेल असा आहे. त्यामुळे त्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. योगा करुन या वयातही फिट राहण्याची किमया पिंकी रोशन यांनी करुन दाखवली आहे. पिंकी रोशन यांनी शेयर केलेल्या त्या व्हिडिओमध्ये पद्मासनातील मुद्रा आपल्याला दिसते. त्या मुद्रेत डोळे बंद करुन पिंकी पाण्यावर तरंगताना दिसत आहे.

यापूर्वी देखील पिंकी रोशन यांनी फिटनेसबाबत वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे. अनेकांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Joshi: ज्येष्ठ अभिनेते अभिनेते सतीश जोशी यांचे निधन; स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास

Arvind Kejriwal : ''मी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नसलो तरी...'' अरविंद केजरीवाल थेटच बोलले

MS Dhoni CSK vs RR : चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर... राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?

Sunil Gavaskar IPL 2024 : आयपीएल सोडून देशाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना शिक्षा करा! गावसकरांनी BCCI कडे केली मागणी

IPL 2024 CSK vs RR Live Score : राजस्थानची संथ फलंदाजी; सिमरजीतने पाडलं खिंडार

SCROLL FOR NEXT