The Song Of Scorpions  Esakal
मनोरंजन

The Song Of Scorpions: इरफान खानचा शेवटचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स'चा ट्रेलर रिलिज! चाहते भावूक

Vaishali Patil

इरफान खानचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' हा चित्रपट हिंदीत रिलिज होणार आहे. आता 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आलं आहे. अभिनेत्याचे चाहते त्यांच्या आवडत्या स्टार इरफानचा हा चित्रपट थिएटरमध्ये लवकरच पाहता येणार आहे. इरफानचा मुलगा मुलगा बाबिल त्याच्या सोशल मिडियावर याची माहिती दिली आहे.

बाबिलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. नेहमीप्रमाणे या चित्रपटातही इरफान खानने त्याच्या अभिनयाने सर्वांना थक्क केले आहे. यात तो राजस्थानी शैलीत दिसत आहे.

ट्रेलरची सुरुवात गोलशिफ्तेह फराहानी म्हणजेच नूरनचे पात्र दाखवून झाली आहे. ती या चित्रपटात वैद्याची भुमिका करतांना दिसत आहे. विंचू चावल्यानंतर फराहानी उपचारासाठी खूप दूर जाते. त्याचबरोबर इरफान हा आदमलाची भुमिका साकरत आहे जो नूरनचा प्रियकर दाखवण्यात आला आहे. तो इरफान फराहानीला लग्नासाठी विचारतांना दिसतो.

त्यानंतर त्याच्या प्रेमाला विरोध आणि त्यापरिस्थिती त्यांची कुचंबणा हे सर्वच दिसत आहे. चित्रपटाची कथा राजस्थानमधील एका गावातील आहे. प्रत्येक दृश्यात तुम्हाला वाळवंट दिसते. चित्रपटाचे संगीत अतिशय दमदार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे. बराच गोंधळ आहे.

इरफानचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' सुमारे 6 वर्षांपूर्वी 2017 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट स्विस-फ्रेंच-सिंगापूर या भाषेत बनवण्यात आला होता, मात्र आता तो हिंदीत प्रदर्शित होत आहे.

इरफानच्या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना बाबील खानने लिहिले - 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन' 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT