Irrfan Khan shares bittersweet emotional video for fans  
मनोरंजन

'मै आपके साथ हूँ भी और नहीं भी' कॅन्सरशी लढा देणाऱ्या इरफानचा व्हिडीओ पाहाच

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलीवूड मध्ये अभिनयाव्यतिरिक्त अनेक प्रेरणादायी उदाहरणे आहेत. अनेक गोष्टींचा सामना करत त्यांनी सामान्य लोकांनाही प्रेरणा दिली आहे.त्यातील एक अभिनेता म्हणजे इरफान खान. इरफान गेल्या एक वर्षापासून कर्करोगावर मात करत आहे. याच संदर्भातील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल होतोय. 

इरफान खान गेल्या वर्षभरापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या कर्करोगाशी लढा देत आहे. त्यानंतर आता तो बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.  त्याचा 'अंग्रेजी मीडियम' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी इरफानने चाहत्यांसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘अंग्रेजी मीडियम’च्या शूटिंगदरम्यानची क्षणचित्रे पाहायला मिळत आहेत. त्यासोबत इरफानने त्याच्या आवाजात हा संदेश रेकॉर्ड केला आहे. इरफानच्या आवाजातील हा व्हिडीओ डोळ्यात पाणी आणणारा आहे.

काय म्हणाला इरफान ?
मै आज आपके साथ हूँ भी और नहीं भी… ये फिल्म अंग्रेजी मीडियम बहुत खास है. सच, यकीन मानिए, मेरी दिल की ख्वाहिश थी की इस फिल्म को उतने ही प्यार से प्रमोट करू जितने प्यार से हम लोगोंने बनाया है. लेकिन, मेरे शरीर के अंदर कुछ अनवाँटेड मेहमान बैठे हुए है उनसे वार्तालाप चल रहा है. देखते है किस करवट उठ बैठता है. जैसा भी होगा, आपको इतेलाह कर दिया जाएगा. कहावत है...बोलने मै अच्छा लगता है पर सच मै जब जिंदगी आपके हाथ मै निंबू थमाती है ना, तो शिकंजी बनाना बहुत मुश्किल हो जाता है. लेकिन आपके पास और चॉईस भी क्या है पॉझिटिव्ह रहने के अलावा? इन हालात मै निंबू की शिकंजी बना पाते है की नाही बना पाते है, ये आप पर है. पर हम सबने इस फिल्म को उसी पॉझिटिव्हिटी के साथ बनाया है. पर मुझे उम्मीद है की ये फिल्म आपको सिखाएगी, हसाएगी, रुलाएगी, फिर हसाएगी शायद!

त्याच्या या व्हिडीओने अनेकांचे डोळे पाणावले. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना, ''सर, तुम्हाला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहे'' असे लिहिले आहे. चाहत्यांनी आणि बॉलिवूडने इरफानला खूप मिस केले. पण, ‘अंग्रेजी मीडियम’च्या निमित्ताने एक दमदार सिनेमा इरफान घेऊन येतोय. 

इरफानवर लंडनमध्ये उपचार सुरु होते. शुटिंगसाठी तो भारतात परतला होता. पण, अजुनही इरफान संपूर्ण बरा झालेला नाही. त्याचमुळे सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो उपस्थित राहू शकणार नाही. असे त्याने या व्हिडीओच्या मार्फत सांगितले. अभिनेत्री राधिका मदान आणि करीना कपूर खान या सिनेमात इरफानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

इरफान  'हिंदी मिडीयम 2' या सिनेमातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यापुर्वी 2017 ला 'हिंदी मिडीयम' हा इरफानचा सिनेमा येऊन गेला आहे. त्याचाच 'हिंदी मिडीयम 2' सिक्वेल असेल. बॉलिवूड लाईफनुसार, सिनेमाच्या निर्मात्यांनी लंडनमध्ये जाऊन इरफानची भेट घेतली. सिनेमाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्याने कथेला होकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT